no images were found
अस्थमा (दमा) व्यवस्थापित करण्यासाठी इनहेलर प्रभावी आणि सुरक्षित आहेत वैद्यकीय तज्ञाद्वारे पुष्टी
कोल्हापूर : सिप्लाने आपल्या रुग्ण जागृती मोहिमेचा नवीनतम टप्पा बेरोक जिंदगी लाँच केला आहे, जो अस्थमा आणि इनहेलर बद्दल जागरूकता वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी एक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती आहे. या मोहिमेद्वारे दम्याच्या उपचारांसाठी इनहेलरच्या वापराबाबत जागरूकता, शिक्षणाद्वारे, गैरसमज दूर करणे आणि रुग्ण आणि डॉक्टरांमधील संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज अहवालानुसार, भारतात दम्याचे रुग्ण 3.43 कोटी पेक्षा जास्त आहेत. जगातील अस्थमा रुग्णांमध्ये 13% भारताचा वाटा आहे आणि दरवर्षी अस्थमाशी संबंधित 43% मृत्यू होतात, ज्यामुळे आपला देश जगातील अस्थमाची राजधानी बनलेला आहे.
डॉ. विकास गुप्ता, इंडिया बिझनेस RX हेड, सिप्ला म्हणाले, “सिप्ला येथे, रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात आणि त्यांना माहितीपूर्ण निवड करण्यासाठी मदत करण्यावर आमचा विश्वास आहे. आमच्या जनजागृती मोहिमेने अस्थमा आणि इनहेलरसाठी लोकांच्या प्रतिसादात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. बेरोक जिंदगी मोहिमेच्या नवीन टप्प्यासह, लोकांना मिथकांची जाणीव करून देण्यासाठी आणि लाखो रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या थेरपीबद्दल जागरुकता वाढवून आमची वचनबद्धता आणखी मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे”
डॉ. मोहन पोतदार, एम.डी. (छाती रोग तज्ञ), कोल्हापूर म्हणाले, “अस्थमा व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रमुख अडथळे दूर करणे महत्त्वाचे आहे, विशेषत: त्या द्वितीय श्रेणीतील शहरांमध्ये, जेथे रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे. इनहेलर किंवा इनहेलेशन थेरपी ही एक वैद्यकीयदृष्ट्या निर्धारित आणि सुरक्षित उपचार आहे जी अस्थमाने पीडित लोकांना रोग व्यवस्थापित करण्यात आणि चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यास मदत करते. इनहेलर्स फुफ्फुसात औषध थेट पोहोचवण्यात मदत करतात, जिथे ते अस्थमाची लक्षणे रोखून, आराम देवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. तथापि, उपचार म्हणून इनहेलरला आपल्या समाजात अत्यंत हीन मानले जाते ज्यामुळे अस्थमाचे रुग्ण दमा विशेषज्ञांकडे जाण्याचे टाळतात. शिवाय, दमा, त्याची लक्षणे आणि उपचारांबद्दल जागरूकता नसल्यामुळे या आजाराचा भार कमी करण्यात मदत करण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर आहे.”