Home आरोग्य शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 

2 second read
0
0
135

no images were found

 

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):-दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351व्या राज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याचे तोरण ज्यादिवशी खऱ्या अर्थाने लावले गेले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. ज्या प्रेरणेने मावळ्यांनी आपले रक्त सांडून स्वराज्य निर्माण केले, त्याच उमेदीने रक्तदान करून सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीला जाता यावे हा हेतू ठेऊन दरवर्षी या शिबिराचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी शिबिराचे पाचवे वर्ष असून छत्रपती शिवाजी चौक येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबीर संपन्न होणार आहे. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन आम आदमी पार्टीने पत्रकाद्वारे केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…