
no images were found
नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजेत असे खाद्यपदार्थ
मुंबई : देशभरात कोविड आणि फ्लूच्या वाढत्या केसेससह रोगप्रतिकारशक्ती प्रबळ व आरोग्यदायी ठेवणे महत्त्वाचे आहे. संसर्गांमधील या हंगामी वाढीमुळे सतत खोकला, सर्दी, पचनसंबंधित समस्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे अशा आरोग्यसंबंधित समस्यांचा धोका आहे. एमबीबीएस व न्यूट्रिशनिस्ट डॉ. रोहिणी पाटील सल्ला देतात की दैनंदिन आहारामध्ये बदाम, हळद व आले यांसारख्या पौष्टिक सुपरफूड्सचा समावेश केल्यास या असुरक्षित काळादरम्यान रोगप्रतिकाशक्ती वाढवण्यास आणि आरोग्य उत्तम ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
चला तर मग, या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या सुपरफूड्सबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. डॉ. रोहिणी संसर्गांच्या या लाटेदरम्यान शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित आहारामध्ये या सुपरफूड्सचा समावेश करण्याची शिफारस करतात.
कॅलिफोर्निया बदाम: ड्राय फ्रूट्सचा राजा म्हणून प्रख्यात असलेल्या कॅलिफोर्निया बदामांमध्ये १५ आवश्यक पौष्टिक घटकांसह आरोग्यदायी फॅट्स, प्रथिने, झिंक, मॅग्नेशियम, अॅण्टीऑक्सिडण्ट्स आणि व्हिटॅमिन ई असते. हे पौष्टिक घटक हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवतात आणि ऊर्जा पातळ्या वाढवण्यास मदत करतात. फूड सेफ्टी अँड स्टॅण्डर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) (भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण)ने शिफारस केल्याप्रमाणे, दैनंदिन आहारामध्ये बदामांचा समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती प्रबळ होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे एकूण आरोग्य उत्तम राहते. तसेच नियमितपणे कॅलिफोर्निया बदामांचे सेवन केल्याने त्वचा आरोग्यदायी राहू शकते आणि बदामांमधील नैसर्गिक भूकेचे शमन करण्याच्या गुणधर्मांमुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
हळद: दाहविरोधी आणि अॅण्टीऑक्सिडण्ट गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संसर्गांविरोधात प्रतिकार करण्यास मदत करते, ज्यामुळे फ्लूचा प्रार्दुभाव असलेल्या काळादरम्यान आहारामध्ये हळदीचा समावेश करणे आवश्यक आहे.
आले: आले अन्नपचनास मदत करते, जळजळ कमी करते आणि आल्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे वातावरण बदलादरम्यान सर्दी व घसा खवखवणे यांना प्रतिबंध करण्यासाठी आले उत्तम आहे.
लसूण:लसणामध्येअॅलिसिनसारखीसंयुगेभरपूरप्रमाणातअसतात, जेरोगप्रतिकारशक्तीवाढवतातआणिअॅण्टीमायक्रोबिल परिणाम देतात, ज्यामुळेतेफ्लूच्याहंगामातविशेषतःफायदेशीरठरतात.
लिंबूवर्गीयफळे:संत्री, लिंबूआणिद्राक्षेयांसारख्यालिंबूवर्गीयफळांमध्येव्हिटॅमिनसी मोठ्या प्रमाणात असते, जेरोगप्रतिकारशक्तीवाढवतेआणित्वचेचेआरोग्यउत्तम ठेवते.ज्यामुळे वातावरणीय बदलादरम्यान ही फळे गुणकारी ठरतात.
पपई:जीवनसत्त्वेअआणिकमोठ्याप्रमाणातअसलेलेपपईपचनासमदतकरते, रोगप्रतिकारशक्तीवाढवतेआणिअॅण्टीऑक्सिडण्टफायदेदेते.
डॉ. पाटील फ्लूच्या हंगामादरम्यान आहारामध्ये बदामांसारख्या या सुपरफूड्सचा समावेश करण्याची शिफारस करतात, ज्यामुळे हंगामी आरोग्यसंबंधित आजारांना प्रतिबंध करण्यास आणि एकूण आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत होते.