Home बँकिंग एचडीएफसी  बँक परिवर्तनने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू 

एचडीएफसी  बँक परिवर्तनने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू 

36 second read
0
0
20

no images were found

एचडीएफसी  बँक परिवर्तनने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या विरोधात जागरूकता मोहीम सुरू 

 

2025 या वर्षात 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करणार आणि 15 शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा स्थापन करणार

 

मुंबई,: 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून एचडीएफसी  बँकेने प्लास्टिकच्या डोळस वापरासाठी एका जागरूकता मोहिमेची सुरुवात करून पर्यावरणविषयक जबाबदारीबाबतची आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही बँक आपले ग्राहक, कर्मचारी आणि सामान्य जनतेसाठी जागरूकता मोहीम राबवत आहे.

       एचडीएफसी  बँकेच्या परिवर्तन या सीएसआर  प्रोग्राम अंतर्गत चालवण्यात येणारी ही मोहीम आपल्या निवडक शाखेच्या ग्राहकांना त्यांच्याकडील प्लास्टिक ई-कचरा त्यांच्या शाखेत रिसायकलिंगसाठी गोळा करण्याचे आणि त्यांच्या मूलभूत गरजांसाठी प्लास्टिकचे पर्याय वापरण्यासाठी आवाहन करणार आहे. शिवाय, बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जागरूकता सत्रे, संकलन उपक्रम आणि स्वच्छता अभियान आयोजित करेल आणि प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी संघटित होऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन देईल.

      बँकेने पर्यावरणावरील प्लास्टिक प्रदूषणाच्या नकारात्मक प्रभावाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि सोप्या पण प्रभावी पद्धतींचा अवलंब करून आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यासाठी लोकांना ऑनलाइन शपथ घेता यावी यासाठी एक समर्पित वेबपेज देखील सुरू केले आहे.

      या जागरूकता मोहिमेबरोबरच बँक देशभरातील समुदायाच्या नेतृत्वाखालील आपल्या कचरा व्यवस्थापन कार्यक्रमास देखील पुढे घेऊन जात आहे. ‘परिवर्तन’च्या माध्यमातून 2025 या वर्षात 1000 पेक्षा जास्त गावांमध्ये घन कचरा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याचे आणि 15 शहरी स्थानिक संस्थांमध्ये सामग्री पुनर्प्राप्ती सुविधा स्थापन करण्याचे बँकेचे ध्येय आहे.

      एक सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये बँकेने कचऱ्याचे वर्गीकरण, त्याचा पुनर्वापर आणि लँडफिलवरील अवलंबन कमी करण्याचे उपाय राबवले आहेत. हे प्रयत्न आपल्या देशाच्या स्वच्छ भारत अभियान आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयासारख्या (SDGs) मिशनशी सुसंगत आहेत आणि हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, आसाम, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत पसरले आहेत, जे शैक्षणिक उपक्रम, कला संस्था आणि वर्तन परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून स्थानिक लोकांचा सहभाग वाढवत आहेत.

      एचडीएफसी बँकेचे डेप्युटी मॅनिजिंग डायरेक्टर श्री. कैझाद भरूचा म्हणाले, “एचडीएफसी बँकेत आमचा विश्वास आहे की, अर्थपूर्ण बदल समाजाच्या सहभागानेच घडवता येऊ शकतो. प्लास्टिक जागरूकता मोहिमेसहित आमचे ‘परिवर्तन’ अंतर्गत जे जे उपक्रम आहेत, ते स्थानिक लोकांच्या मदतीसाठी आणि स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यासाठी आहेत. प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध एकत्रितपणे लढा देऊन आम्ही पर्यावरण संरक्षणात तसेच आम्ही ज्या समाजात काम करतो त्या समाजाची सामाजिक आणि आर्थिक बाजू मजबूत करण्यात खारीचा वाटा देत आहोत.”

      कांगडा, हिमाचल प्रदेश येथील एका महत्त्वाच्या प्रकल्पात वेस्ट वॉरियर्ससोबत भागीदारीत अपसायकल केलेल्या प्लास्टिक बाटल्यांच्या बुचांमधून एक 26 फुट उंचीचे भव्य म्यूरल उभारण्यात आले आहे. बिर आणि धर्मशाला येथे 10 पंचायतींमध्ये एचडीएफसी बँक ‘वर्तन परिवर्तन अभियान’ लागू करत आहे, ज्याच्या मार्फत 2024-25 वर्षात 200 मेट्रिक टन कोरडा कचरा लँडफिल्समधून हटवण्यात आला.

      विशाखापट्टणम येथे एचडीएफसी बँकेने कचऱ्याचे आर्थिक संधीत रूपांतर करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना आणि SHGs ना प्रशिक्षित करण्यासाठी ग्राम पंचायतींशी सहयोग केला आहे. अशाच प्रकारचे उपक्रम छत्तीसगड, आसाम आणि केरळमध्ये राबवून हजारो टन कोरड्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे, अनौपचारिक कचरा कामगारांना या उपक्रमात सामावून घेण्यात आले आहे आणि स्थानिक उपजीविका वाढवण्यात हातभार लावला आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार

महाराष्ट्रात डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार मुंबई:-:-डिजिटल मीडियावर काम करणाऱ्…