no images were found
एचडीएफसी बँके तर्फे कॉर्पोरेट्स आणि व्यक्तीमध्ये आधुनिक सीबीडीसी चा वापर वाढवण्यासाठी पाच नवीन डिजिटल रुपयाच्या नाविन्यांची सुरुवात
ग्राहक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील संस्थांमध्ये भारताच्या सार्वभौम डिजिटल चलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी डिजिटल रुपयाचे नवीन प्रकार सादर
मुंबई, :- एचडीएफसी बँकेने ‘डिजिटल रुपया’चे (सीबीडीसी) विविध उपयोग सादर केले असून यातून दैनंदिन ग्राहक व्यवहार आणि कॉर्पोरेट कार्यप्रणाली या दोन्ही क्षेत्रांत भारताच्या या सार्वभौम डिजिटल चलनाचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. गेल्या आठवड्यात एका उद्योग-मंचावर सादर करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून डिजिटल रुपयाची व्यावहारिक उपयुक्तता, नियामक नियमांचे पालन आणि व्यापक उपलब्धता या बाबी स्पष्ट होतात. तसेच, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा एक सहज आणि दैनंदिन भाग म्हणून डिजिटल रुपयाचे स्थान यामुळे अधिक दृढ होत आहे.
“डिजिटल रुपया सार्वभौम चलनाच्या विश्वासाला प्रोग्रामेबिलिटी, पारदर्शकता आणि अधिक मजबूत नियंत्रणांशी जोडतो,” असे एचडीएफसी बँकेचे ग्रुप हेड, ब्रांच बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनेल्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर, श्री. आशिष पार्थसारथी यांनी सांगितले “हे उपयोग किरकोळ आणि घाऊक बाजारांमधील उद्देशानुरुप पेमेंट, अनुपालन आणि ऑडिटेबिलिटी यांसारख्या नवीन गरजा पूर्ण करतात. सीबीडीसीच्या क्षमतेला जबाबदार आणि विस्तारक्षम उपायांमध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही आरबीआयसोबत काम करण्यास कटिबद्ध आहोत.”
या नवीन उत्पादनां विषयी बोलतांना एचडीएफसी बँकेचे सिनियर ईव्हीपी श्री. रजनीश प्रभू यांनी सांगितले “ डिजिटल रुपयाच्या वापरातील पुढील टप्पा हा प्रमाण आणि रोजच्या वापरातून निश्चित होणार आहे. सीबीडीसी ला यूपीआय, व्यापार्यांचा वापर, रिवॉर्ड्स, कर्मचार्यांचे लाभ आणि ऑफलाईन पेमेंट्स सारख्या ओळखीच्या माध्यमातून केल्याने आम्ही ग्राहकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी डिजिटल रुपया रोजच्या जीवनात आणून प्रोग्रामेबल पेमेंट्स साठी नवीन शक्यता निर्माण करण्यावर आम्ही भर देत आहोत.”
सीबीडीसी हे यूपीआय ला पूरक ठरते, कारण ते प्रोग्रामेबिलिटी, अनुपालन आणि पारदर्शकता प्रदान करते, जे केवळ खात्यावर आधारित डिजिटल पेमेंट देऊ शकत नाही. स्वयंचलित कॉर्पोरेट वितरणापासून ते ऑफलाइन इन-फ्लाइट पेमेंटपर्यंत, एचडीएफसी बँकेची नवीनतम उत्पादने ही रिटेल आणि होलसेल या दोन्ही परिसंस्थांमधील उच्च क्षमतेच्या, वास्तविक क्षणांमध्ये डिजिटल रुपयाला रुजविण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.