no images were found
एचडीएफसी बँके तर्फे प्रथमच इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष अशा फ्लेक्झी इलेक्ट्रिक कार लोनची सुरुवात
मुंबई, – एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे प्रथमच अनोख्या अशा फ्लेक्झी इलेक्ट्रिक कार लोन या नाविन्यपूर्ण ऑटो कार लोनची सुरुवात केली असून ही योजना विशेषरुपाने इलेक्ट्रिक व्हेईकल्स (ईव्हीज) च्या खरेदीसाठी अर्थपुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. फ्लेक्झी इलेक्ट्रिक कार लोन या योजने अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या बॉडी आणि बॅटरी साठी वेगवेगळ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. यामध्ये बॅटरी वरील कर्ज हे फेडण्यासाठी ग्राहकांना अधिक कालावधी मिळणार आहे. यामुळे ग्राहकांना ईएमआय अधिक चांगल्या प्रकारे भरणे शक्य होणार आहे. ही कर्ज उत्पादन सुविधा बँकेच्या संपूर्ण भारतात असलेल्या ९७०० हून अधिक शाखांमध्ये उपलब्ध असणार आहे.
इव्हीच्यासध्याच्या खर्चाच्या रचने मुळे आयसीई (इंटर्नल कंबश्चन इंजिन) च्या तुलनेत बॅटरीचे वाहन घेणे खर्चिक बाब ठरते, कारण इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी हा घटक सर्वात महाग घटक आहे.
बॅटरीचा ईएमआयचा हिस्सा हा आयसीई वाहनाच्या चालवण्याच्या खर्चा एवढा असेल. हा दृष्टिकोन विकसित होत असलेल्या बॅटरी सबस्क्रिप्शन मॉडेल्ससाठी देखील योग्य आहे, ज्यामुळे ईव्हीची मालकी अधिक सुलभ आणि किफायतशीर बनते.
एचडीएफसी बँकेच्या फ्लेक्झी ग्रीन लोन ची प्रमुख वैशिष्ट्ये खालील प्रमाणे :
- केवळ ईव्ही खरेदीसाठी तयार केलेली योजना – फ्लेक्सी इलेक्ट्रिक कार लोन योजना ही खास ईव्ही खरेदी सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे.
- भिन्न कर्ज कालावधी – निवडक पध्दतीने तयार करण्यात आलेला खर्च
- ईव्हीच्या विस्तृत श्रेणीमध्ये प्रवेश – ग्राहकांना आघाडीच्या ओईएम्सच्या ईव्ही बुक करण्याचा पर्याय मिळेल.
या योजनेच्या सुरुवाती विषयी माहिती देतांना एचडीएफसी बँकेच्या रिटेल ॲसेट्स आणि रुरल बँकिंगचे ग्रुप हेड श्री. अरविंद वोहरा यांनी सांगितले “ भारतात ईव्ही क्रांती वेगाने गती घेत आहे. याची प्रमुख कारणे म्हणजे सरकारी प्रोत्साहन, सुधारीत तंत्रज्ञानाचा आग्रह आणि योग्य धोरणांच्या आधार होय. भारत ईव्ही क्रांतीचा स्विकार करण्यास सज्ज आहे. आमचा असा दृढ विश्वास आहे की आमचे फ्लेक्झी इलेक्ट्रिक कार लोन ईव्ही गाडीची मालकी अधिक चांगली, अजोड आणि त्रासमुक्त करण्यात महत्त्वपूर्ण भुमिका बजावेल.”
नुकत्याच मिळालेल्या अहवालानुसार भारतात ईव्हीचा वापर वेगाने वाढू लागला आहे. २०३० पर्यंत ईव्ही प्रकारच्या वाहनांचा वापर हा सध्याच्या ७ टक्क्यांवरुन वाढून १५-२० टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर भारत सरकारने २०३० पर्यंत ३० टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे लक्ष्य समोर ठेवल्याने देशात ईव्हीचा वापर वाढीस लागेल त्याच बरोबर बॅटरी तंत्रज्ञानातील सुधारणां सह ओईएम्स कडून उत्पादन श्रृंखलांतील वाढी मुळे ईव्हीचा वापरही वाढू लागेल.