no images were found
कोल्हापुरात लोकमंगल बँकेच्या ८ व्या शाखेचे उद्घाटन; ३६५ दिवस सेवा देणारी एकमेव बँक
कोल्हापूर(प्रतिनिधी): सोलापूरसह विविध जिल्ह्यांमध्ये ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा पुरवणाऱ्या लोकमंगल को-ऑप बँकेच्या ८व्या शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी एलिक्सा पार्क, कोल्हापूर येथे अध्यक्ष आमदार सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्राहकांना दर्जेदार बँकिंग सेवा देण्याबरोबरच शासकीय योजनेंतर्गत कर्ज सेवा, विविध बँकिंग सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बँकेच्या सर्व संचालकांनी स्पष्ट केले. उद्घाटन सोहळ्या नंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे, संचालक नरेंद्र काटीकर, सीए सौरभ अंबुरे, प्रल्हाद कांबळे, देवानंद चिलवंत, सिद्धार्थ सर्जे, जितेंद्र लाड, गजानन भाकरे, विजय कुलकर्णी, अनंता चव्हाण, सतीश लामकाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह आदी उपस्थित होते.लोकमंगल बँकेच्या कोल्हापूर शाखा उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई, बायस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी ३६५ दिवस बँकिंग सेवा देणारी ही एकमेव बँक असून, मोबाईल पेमेंट सर्व्हिस, आरटीजीएस-एनईएफटी, बँक आपल्या दारी या सुविधे अंतर्गत
दिव्यांग ज्येष्ठांना घरपोच बँकिंग सेवा आणि ठेवीवर अर्धा टक्के जादा व्याजदर यासारख्या सेवांची माहिती देण्यात आली.संचालक नरेंद्र काटीकर म्हणाले, लोकमंगल बँकेने दर्जेदार सेवेच्या जोरावर कोल्हापुरात ८ व्या शाखेत पदार्पण केले आहे. १५ जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र विस्तार केला आहे. १९९८ मध्ये स्थापन झालेल्या या बँकेची २०२५-२६ नुसार सभासद संख्या १४ हजारांवर पोहोचली आहे. बँकेने ३६४ कोटींच्या वर शासकीय योजनेंतर्गत कर्ज वाटप केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाखा सुरू करण्यामागे लोकमंगल बँकेच्या संचालक मंडळाकडून औद्योगिक वसाहती, साखर कारखाने, कृषिपूरक उद्योग, लघु उद्योग आहेत. या सर्वांना ‘लोकमंगल ‘च्या माध्यमातून चांगल्या बँकिंग सेवा दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले. बँकेचे २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार वसूल भागभांडवल ४६ कोटी ८२ लाख, ठेवी ९०१ कोटी, एनपीए ०.७९ टक्के, नफा ५ कोटी ९० लाख, कर्जे ५२३ कोटी आहेत. कोल्हापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे.त्यामुळे आई पर्यटन, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना सारख्या शासनाच्या वतीने सर्व योजनांचा लाभ कोल्हापूरकराना घेता येईल. असेही यावेळी सांगण्यात आले.