
no images were found
मनोरंजनाची पर्वणी!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’, ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’ लक्षवधेक एपिसोड्ससह प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मधील एपिसोडबाबत वरूण शर्मा म्हणाला, ‘‘अरविंद (मयंक मिश्रा) हरिद्वारवरून परत येतो आणि सर्वांना सांगतो की, कृष्णा (आयुध भानुशाली) घर सोडून गेला तरच अशोक (मोहित डागा) घरी परत येईल. पुरावा म्हणून अरविंद अशोकने लिहिलेले पत्र देखील दाखवतो. यशोदा (नेहा जोशी) अरविंदचा डाव उधळवून लावते आणि तो मान्य करतो की, ते पत्र अशोकने लिहिलेले नसते. त्यानंतर वरूण (मिक्की दुदाणे) कृष्णाला त्याच्यासोबत घेऊन जाण्यासाठी येतो, पण यशोदा वरूणला कृष्णाच्या खऱ्या वडिलाचा शोध लावण्यासाठी डीएनए चाचणी करण्यास सांगते.’’
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील एपिसोडबाबत राजेश म्हणाली, ‘‘कमिशनर (किशोर भानुशाली) हप्पूला (योगेश त्रिपाठी) त्याचे सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्याचा आदेश देतो. तो बेनीसोबत (विश्वनाथ चॅटर्जी) मद्यपान करण्यामध्ये व्यस्त असल्यामुळे एचसीआरला (ऋतिक, चमची व रणबीर) त्याचे अकाऊंट तयार करण्याचे सांगतो. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर राजेश (कामना पाठक) व बिमलेश (सपना सिकरवार) त्यांच्या पतीचा प्रामाणिकपणा तपासण्याचे ठरवतात आणि काटेच्या (गझल सूद) मदतीने त्यांचे खोटे सोशल मीडिया अकाऊंट्स तयार करतात.
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील एपिसोडबाबत अंगूरी म्हणाली, ‘‘मॉडर्न कॉलनीमधील सर्वजण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याबाबत खूप उत्सुक आहेत. सर्वांना समजते की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार टिम्मी (इमरान नाझीर खान) विभूतीचा चुलत भाऊ आहे. विभूती टिम्मीला मॉडर्न कॉलनीमध्ये येण्याचे आमंत्रण देतो. सर्वजण विभूतीचे कौतुक करतात आणि अनिता (विदिशा श्रीवास्तव) देखील त्याबाबत बढाई मारते. टिका (वैभव माथूर), टिलू (सलिम झैदी) व प्रेम (विश्वजीत सोनी) हे तिवारीसोबत (रोहिताश्व गौड) सट्टेबाजी करत नफा मिळवण्यासाठी टिम्मीकडून सामन्याबाबत जाणून घेण्याची योजना आखतात. पण अंगूरी (शुभांगी अत्रे) तिच्या क्रिकेट ज्ञानासह टिम्मीला प्रभावित करते आणि टिम्मी तिच्याशी फ्लर्ट करू लागतो.’’