Home सामाजिक इस्त्रोकडून विक्रम लँडरचा नवा फोटो शेअर

इस्त्रोकडून विक्रम लँडरचा नवा फोटो शेअर

1 second read
0
0
41

no images were found

इस्त्रोकडून विक्रम लँडरचा नवा फोटो शेअर

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोकडून चांद्रयान ३ संदर्भात सातत्यानं अपडेट देण्यात येत आहेत. चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्टला उतरल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरनं काम सुरु केलं होतं. चंद्रावर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर प्रज्ञान रोवर आणि विक्रम लँडरला इस्त्रोनं स्लीप मोडवर जाण्याची कमांड दिली होती. इस्त्रोला आता २२ सप्टेंबरची प्रतीक्षा आहे. कारण, या दिवशी चंद्रावर सूर्योदय होईल. सूर्यप्रकाशानं विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरवरील सोलर पॅनेल चार्ज होऊन ते पुन्हा सक्रीय करता येतात का यासाठी इस्त्रोनं रिसीव्हर ऑन ठेवले आहेत. इस्त्रोतील वैज्ञानिकांचं लक्ष २२ सप्टेंबरकडे लागलेलं असताना चंद्रावरील विक्रम लँडरचा नवा फोटो शेअर करण्यात आला आहे.
इस्त्रोनं चंद्रावर दिमाखात उभ्या असलेल्या विक्रम लँडरचा फोटो शेअर केला आहे. ३ सप्टेंबरला विक्रम लँडरनं पुन्हा एकदा सॉफ्ट लँडिंग केलं होतं. आता इस्त्रोनं शेअर केलेल्या फोटोत विक्रम लँडरसह चंद्राच्या भूभागावर लाल, निळा आणि हिरवा रंग दिसत आहे. मात्र, चंद्राच्या भूभागावर हे रंग कसे दिसू लागले हे इस्त्रोनं सांगितलं आहे.
खरंतर चंद्राच्या भूभागावर रंग आढळून येत नाहीत. तर, मग या फोटोत लाल, निळा आणि हिरवा रंग कसा दिसत आहे. इस्त्रोनं विक्रम लँडरचा हा फोटो शेअर केला आहे तो थ्रीडी फोटो आहे. इस्त्रोच्या माहितीनुसार हा फोटो कित्येक फोटो जोडून शेअर करण्यात आला आहे. याला एनाग्लिकफ स्टीरिओ किंवा मल्टी व्यू इमेज म्हटलं जातं. यामध्ये थ्री डायमेंशन इमेज बनवली जाते. हा फोटो देखील एनाग्लिफ नॅवकॅम स्टीरिओ इमेजचा वापर करुन बनवण्यात आली आहे. यामध्ये प्रज्ञान रोवरनं टिपलेल्या लेफ्ट आणि राईट इमेजचा समावेश करण्यात आला आहे.
या फोटोला डावीकडून पाहिल्यास तो लाल चॅनेलद्वारे दिसेल. डावीकडून पाहिल्यास निळ्या चॅनेलद्वारे पाहता येईल. हे दोन्ही फोटोजच्या इटर्नल स्टीरिओ इफेक्ट चा परिणाम आहे. इस्त्रोनं तुम्हाला हा फोटो थ्रीडी व्यूमध्ये पाहायचा असेल तर रेड किंवा सियान चश्मा वापरावा लागेल. नॅवकॅमला LEOS आणि ISRO कडून विकसित करण्यात आलं आहे

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मुख्य इमारतीमधील नागरी सुविधा केंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाच दिवस बंद छत्रपती शिव…