Home राजकीय भारतीय जनता पार्टी कोल्हापुरची कार्यकारणी जाहीर

भारतीय जनता पार्टी कोल्हापुरची कार्यकारणी जाहीर

4 second read
0
0
112

no images were found

भारतीय जनता पार्टी कोल्हापुरची कार्यकारणी जाहीर

 

कोल्हापूर : दिनांक 19 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष पदी विजय महादेव जाधव, कोल्हापूर (पश्चिम) ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राहूल बजरंग देसाई यांची तर हातकणंगले (पूर्व) ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजवर्धन विठृलराव नाईक-निंबाळकर यांची निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

जिल्हाध्यक्ष पदी निवडी नंतर आपल्या कार्यकारणीचा पुढील टप्पा म्हणून आपल्या जिल्हाची कार्यकारणी जिल्हाध्यक्षांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सादर करण्यात आली होती. 2 दिवसांपूर्वी मुंबई येथे याविषयी झालेल्या सविस्तर चर्चे नंतर या सादर केलेल्या यादीवर सकारात्मक विचार करून आज वरील 3 विभागांच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्याच्या सूचना मा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व नाम चंद्रकांतदादा पाटील यांच्यावतीने प्राप्त झाल्या आहेत.

त्यामुळे आज रोजी तीनही जिल्हाध्यक्ष प्रिंट मिडिया, इलेक्ट्रोनिक मिडिया, सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली जिल्हा कार्यकारणी जाहीर करीत आहेत. लवकरच जिल्हा कार्यलयात या नवनियुक्त पदाधिकारी यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन

रॉयल एनफिल्डने सादर केली क्लासिक ३५० ‘सिग्नेचर व्हाईट’ एडिशन सोलापूर: मध्यम क्षमतेच्या (२५…