
no images were found
मुख्यमंत्री सहायता निधी व श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास याच्या मार्फत निधी वितरण
कोल्हापूर : नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे गरजू रुग्णांना “दिलसे दिलासा” या प्रेरणा देण्याच्या उद्देशाने वैद्यकीय सहायता कक्ष कार्यरत आहे. या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया, औषधे, शासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या कडून वैद्यकीय मदत प्राप्त करून दिली जाते. मुख्यमंत्री सहायता निधी व श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्या माध्यमातून आजपर्यत अनेक रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा यामुळे मिळाला आहे.
आज रोजी रुग्णांच्या नातेवाईकांना “दिलसे दिलासा” (७ दिवसात ७ लाख निधी मंजूर) रक्कम रुपये ७ लाख २० हजार (एकत्रित) निधीचे प्रमाणपत्राचे व धनादेशाचे वितरण भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. महेश जाधव, भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य श्री. राहुल चिकोडे, कोल्हापूर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष श्री. विजय जाधव, भाजप शाहुवाडी विधानसभा प्रमुख श्री. राजू प्रभावळकर, जिल्हा सरचिटणीस भाजपा अनुसूचित जाती आघाडी (ग्रामीण) श्री. लालासो पोवार,भाजपा युवा मोर्चा पन्हाळा तालुका अध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याकरिता नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.बाळासाहेब यादव यांचे मार्गदर्शन लाभले. वैदकीय कक्ष प्रमुख श्री. विकास देशमुख, समन्वयक संदीप घारे यांचे विशेष सहकार्य लाभले. वैद्यकीय कक्ष्याच्यावतीने राहूल चौगले, आकाश दळवी, हिंदुराव पाटील, प्रथमेश पाटील, विजयसिंह पाटील, श्रीधर गुरव यांनी काम पाहिले. तरी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी वैद्यकीय सहाय्यता कक्ष, डी. ३/५ अथर्व ए एम्पार, दुसरा मजला, सासणे ग्राउंड समोर, ताराबाई पार्क, कोल्हापुर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.