पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार:लाडक्या लोकनेत्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला कोल्हापूर, : अनेकांना जगण्याचा बळ देणाऱ्या, अनेक कुटुबांना आधार देणाऱ्या, लाखोंचे जीवन फुलविण्याऱ्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणा-या शिक्षण महर्षी लोकनेता, ज्ञानतपस्वी पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. पॅव्हेलियन मैदान येथे पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपटलेल्या …