Home निधन वार्ता खा .महाडिक यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली   

खा .महाडिक यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली   

26 second read
0
0
119

no images were found

 खा .महाडिक यांच्याकडून डॉ. डी वाय पाटील यांना भावपूर्ण आदरांजली                                                                       कोल्हापूर:शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. सात विद्यापीठांच्या माध्यमातून ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांचे करिअर घडवले, खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रचार प्रसार केला, असे डॉक्टर डी वाय पाटील माझ्यासाठी आदरणीय आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व होते. आरोग्य क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले.  आमदार म्हणूनही त्यांनी काही काळ राजकारणात सक्रिय भूमिका बजावली. तर तीन राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी तत्त्वनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ काम पाहिले.  महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जीवनातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे नाव अजरामर राहील. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे फक्त कोल्हापूरचे नव्हे तर महाराष्ट्राचे अतिव नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली..
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता
Comments are closed.

Check Also

‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पोहरा नदी पुनरुज्जीवनासह विविध कामांचा आढावा

‘अमृत-2’ अंतर्गत सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पोहरा न…