Home निधन वार्ता आदरणीय पद्मश्री डॉ.डी .वाय .पाटील (दादा) यांची अंत्ययात्रा आज बुधवार सायंकाळी चार वाजता लाईन बाजार कसबा बावडा येथून निघणार

आदरणीय पद्मश्री डॉ.डी .वाय .पाटील (दादा) यांची अंत्ययात्रा आज बुधवार सायंकाळी चार वाजता लाईन बाजार कसबा बावडा येथून निघणार

10 second read
0
0
112

no images were found

आदरणीय पद्मश्री डॉ.डी .वाय .पाटील (दादा) यांची अंत्ययात्रा आज बुधवार सायंकाळी चार वाजता लाईन बाजार कसबा बावडा येथून निघणार

कोल्हापूर (प्रतिनिधी):-शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे, बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षणविश्वासह सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

      उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचे ध्येय उराशी बाळगत डॉ. पाटील यांनी देशभरात अनेक शैक्षणिक संस्था, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, विद्यापीठे आणि रुग्णालयांची उभारणी केली. त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाली.

     कोल्हापूरच्या मातीतून उभे राहून राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणाऱ्या डॉ. पाटील यांनी बिहारचे राज्यपाल म्हणूनही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. “दूरदृष्टी असलेले शिक्षणमहर्षी हरपले,” अशा भावना व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

    आदरणीय पद्मश्री डॉ. डी .वाय. पाटील दादा यांची अंत्ययात्रा आज बुधवार 5 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता डी .वाय .पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा येथून निघणार आहे. सायंकाळी 5 वाजता पॅव्हेलियन ग्राउंड ,कसबा बावडा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निधन वार्ता
Comments are closed.

Check Also

श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!

श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार! …