no images were found
एसएमएफजी इंडिया क्रेडिटने महाराष्ट्राच्या पंढरपूर वारीमागील अनामिक नायकांचा केला गौरव
पंढरपूर, महाराष्ट्र : महाराष्ट्रातील अत्यंत श्रद्धेय अशा पंढरपूर वारीचा गाभा असलेल्या ‘सेवा हीच भेट’ या भावनेचा सन्मान करण्यासाठी, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने (SMFG India Credit) एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले. या कार्यक्रमाद्वारे अशा अज्ञात नायकांचा गौरव करण्यात आला, ज्यांची निःस्वार्थ सेवा आणि अढळ निष्ठा पंढरपूर वारीच्या यात्रेसाठी आधारभूत ठरते. इतरांच्या सेवेसाठी असलेल्या त्यांच्या निष्ठेची दखल या उपक्रमाद्वारे घेण्यात आली; ज्यातून “मानवता हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ सेवा आहे,” हा कालातीत संदेश अधोरेखित होतो.
या वर्षीच्या पंढरपूर वारीमध्ये 25 लाखांहून अधिक भाविक सहभागी झाले होते, ज्यामुळे ही भारतातील सर्वात मोठ्या वार्षिक तीर्थयात्रांपैकी एक ठरली आहे. या अनोख्या आध्यात्मिक प्रवासामागे हजारो स्वयंसेवक, कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम असतात. या संपूर्ण यात्रेदरम्यान हे सर्वजण भाविकांची सुरक्षा, सोय आणि आरोग्य जपण्यात मोलाची भूमिका बजावतात. वारीदरम्यान पाणी वाटप, वैद्यकीय मदत, मार्गदर्शक सेवा, स्वच्छता व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सेवांमध्ये योगदान देणाऱ्या या स्वयंसेवकांचा आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा एसएमएफजी इंडिया क्रेडिटतर्फे गौरव करण्यात आला. स्थानिक प्रशासन, पोलीस दल, मंदिर प्रशासन आणि इतर प्रमुख घटकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते. या शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेमागील सामूहिक प्रयत्नांची दखल त्यांनी घेतली आणि त्यांचे कौतुक केले.
अर्थपूर्ण सामाजिक सहभागासाठी प्रयत्नशील प्रयत्नशील असलेली संस्था म्हणून, एसएमएफजी इंडिया क्रेडिटचा विश्वास आहे की, अशा सेवाकार्याची दखल घेणे म्हणजे मानवता, जबाबदारी आणि सामूहिक प्रगती यांसारख्या मूल्यांचा गौरव करणे होय. ही मूल्ये पंढरपूर वारीची दीर्घकाळापासून ओळख राहिली आहेत. पडद्यामागून अथक परिश्रम करणाऱ्या स्वयंसेवकांचा आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करून, हा उपक्रम लाखो वारकऱ्यांना सुरक्षितपणे, सुलभतेने आणि सन्मानाने वारी पूर्ण करणे शक्य करणाऱ्या निःस्वार्थ सेवा आणि सामुदायिक सहभागाच्या त्या चिरंतन भावनेला अभिवादन करतो.