Home गौरव सन्मान डीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएच डी

डीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएच डी

1 second read
0
0
21

no images were found

डीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएच डी

कोल्हापूर (प्रतिनिधी):-साळोखेनगर येथील डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे सहाय्यक प्राध्यापक गणेश ईश्वर राठोड आणि रोहीत शांतिनाथ बारवाडे यांना मध्यप्रदेशमधील मानसरोवर ग्लोबल विद्यापीठ, भोपाळकडून पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

गणेश राठोड यांनी ‘सायबर सिक्युरिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज नेटवर्कमधील घुसखोरी ओळखण्यासाठी ऑप्टिमायझेशन-सक्षम हायब्रिड डीप लर्निंग मॉडेल विकसित केले. तर रोहीत बारवाडे यांनी हेल्थकेअर आणि इंटरनेट ऑफ मेडीकल थिंग्ज या क्षेत्रात संशोधन केले आहे. त्यांनी तीव्र लिम्फोसाइटिक ल्युकेमिया आणि तीव्र मायलॉइड ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाच्या प्रकारांचे स्वयंचलित निदान करण्यासाठी डीप लर्निंग मॉडेल विकसित केला आहे. या संशोधनामुळे रक्ताच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्यास मदत होऊ शकते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, कॅम्पस डारेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील यांनी डॉ. राठोड व डॉ. बारवाडे यांचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेधा देशमुख भास्करन

शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे – कादंबरीकार मेध…