no images were found
डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक आरोग्यदिन साजरा
कसबा बावडा( प्रतिनिधी ): डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे शुक्रवारी जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी यांनी आरोग्य फेरी काढून सुदृढ आरोग्याबाबत जनजागृती केली. त्याचाबरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती मानली जाते. आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेकडून दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. यावर्षी सर्वांसाठी आरोग्य (Health For All) ही थीम ठेवण्यात आली होती. त्यानुसार डी. वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडीच्यावतीने जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे सर्व विभाग, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फ़िजिओथेरपी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले होते. हॉस्पिटलपासून महाराणी ताराबाई पुतळा ते पुन्हा हॉस्पिटल अशा सुमारे तीन किमी मार्गावरू आरोग्य रॅली काढण्यात आली. यावेळी आरोग्य जनजागृतीपर विविध घोषणा देण्यात आल्या. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अधिष्ठाता डॉ. आर. के. शर्मा, वैदयकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. राजेश ख्यालाप्पा, डॉ. वसुधा सावंत, डॉ. राजश्री माने, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह सर्व विभागप्रमुख, डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कुलपती डॉ संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन तर कुलगुरू डॉ. आर. के. मूदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव यांचे सहकार्य लाभले.