no images were found
देशात कोरोना वाढला: केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया घेणार बैठक
देशात कोरोना रुग्णसंख्येचा वेग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.दरम्यान गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन दिवसात 2300 हून अधिक कोविड रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीत देशातील सर्व राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरुच आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,३३५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या २५,५८७ वर पोहोचली असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना रुग्णवाढीबाबत माहिती देताना दि इंडियन सार्स कोव्ह २ जिनोमिक्स कन्सोर्टिम अर्थात बायोटेक्नॉलॉजी विभागाने सांगितले की, कोरोना विषाणूचे नवीन स्वरुप देशातील ३८ टक्के संसर्ग प्रसारासाठी जबाबदार आहे. यासंदर्भात INSACOG ने आपाला अहवाल आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत सादर केला