Home बँकिंग केडीसीसी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार        

केडीसीसी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार        

1 min read
0
0
9

no images were found

केडीसीसी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार

       

 

       

कोल्हापूर,)(प्रतिनिधी):-कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन २०२३ -२४ सालासाठी “कै.  वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक” पुरस्कार जाहीर झाला. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्पर्धेमध्ये पुणे विभागातून बँकेचा हा गौरव झाला.        असोसिएशनच्यावतीने पुरस्कार वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

         

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ भगवंत कड, उपाध्यक्ष प्रंचित अरविंद पोरेड्डीवार आणि सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय घोणसे यांनी लेखी पत्राद्वारे बँकेचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

             

*महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड -मुंबई यांच्यावतीने दरवर्षी सहकारात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी बँकांना पुरस्कार वितरण केले जाते. पुरस्कार वितरणाचे हे २६ वे वर्ष आहे. सन २०२२-२३ या आर्थिक सालासाठीही बँकेला उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती बँक हा विशेष पुरस्कार मिळाला होता.

                   

*”दृष्टीक्षेपात आर्थिक मापदंड……”*

केडीसीसी बँकेच्या दि. ३१ मार्च २०२५  या आर्थिक वर्षातील बँकेचे आर्थिक मापदंड असे………!

         

□ ढोबळ नफा: रू. २४५ कोटी

   

□ वसूल भाग भांडवल: ३०७ कोटी

 

□ ठेवी: १०, ६३५ कोटी   

 

□ कर्जे: ७, ४२३ कोटी

 

□ खेळते भांडवल: १३, ३४६ कोटी

 

□ सी.आर.ए.आर.: १५. ८५  टक्के

         

□ नेट एनपीए: शून्य टक्के

  

□ ढोबळ एनपीए: ४.१८  टक्के  

 

□ सर्वच म्हणजे १९१ शाखा नफ्यात

             

बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी स्वयंरोजगार व उद्योग- व्यवसायाच्या उभारणीसाठी ताराराणी अर्थसाहाय्य योजना ही अल्प व्याजदराची कर्ज योजनाही सुरू केली आहे. तसेच;  बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या विविध योजना राबविल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषी- औद्योगिक क्रांतीमध्येही बँकेचे मोठे योगदान आहे. बँकेने तंत्रज्ञानातही मोठी गरुडभरारी घेतलेली आहे.

   

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे : राज्यपाल 

  अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे : राज्यपाल  मुंबई, : मुंबई विद्यापीठ हे स…