Home बँकिंग फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापुराची पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित 

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापुराची पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित 

4 second read
0
0
54

no images were found

फेडरल बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत – फेडरल स्किल ऍकॅडमी, कोल्हापुराची पहिली ऍल्युमिनी मीट आयोजित 

कोल्हापूर, :- फेडरल बँकेच्या सीएसआर शाखा असलेल्या फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशन अंतर्गत चालवली जाणारी प्रमुख कौशल्य विकास योजना फेडरल स्किल ऍकॅडमी (एफएसए), कोल्हापूरने नागला पार्क येथील बालाजी गार्डन हॉलमध्ये आपली पहिली ऍल्युमिनी मीट (माजी विद्यार्थी मेळावा) यशस्वीरित्या आयोजित करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या कार्यक्रमात 200 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील नेते आणि बँकिंग व्यावसायिक एकत्र आले होते.या कार्यक्रमात एफएसएच्या पदवीधर विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला आणि रोजगारक्षमता वाढवणे आणि स्थानिक आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या संरचित कौशल्य विकासाच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेराजखान पठाण, डीव्हीपी आणि रिजनल हेड, फेडरल बँक, कोल्हापूर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जयदीप चौगुले, चेअरमन, शिरोळी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूर (एसएमएके) उपस्थित होते.  

फेडरल बँकेचे उपाध्यक्ष आणि सीएसआर प्रमुख शाजी के. व्ही.म्हणाले,“ फेडरल स्किल ऍकॅडमी ही फेडरल बँक हॉरमिस मेमोरियल फाउंडेशनने अंमलबजावणी भागीदारांच्या सहकार्याने राबवलेला एक अत्यंत प्रभावशाली उपक्रम आहे. 2015 साली सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे, आम्ही 10,000 हून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली आहेत. कोल्हापूर येथील फेडरल स्किल ऍकॅडमी 2018 साली सुरू झाली आणि या केंद्रात आम्ही 1800 हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे, ज्याचा प्लेसमेंट दर 90% आहे. ही कौशल्य ऍकॅडमी कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे, ज्यामुळे त्यांना करिअर घडवण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळाली आहेत.”

प्रमुख पाहुणे जयदीप चौगुले यांनी उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी याबद्दल माहिती दिली.या बैठकीमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थ्यांसोबतचा संवाद सत्र, ज्यामध्ये माजी प्रशिक्षणार्थींनी आपला वैयक्तिक करिअरचा अनुभव सांगितला आणि एफएसएच्या व्यावहारिक, नोकरी-केंद्रित प्रशिक्षणामुळे त्यांची व्यावसायिक संधी आणि जीवनमान सुधारण्यास कशी मदत झाली, हे सांगितले.फेडरल स्किल ऍकॅडमी ही फेडरल बँकेचा एक प्रमुख उपक्रम आहे, जी एसबी ग्लोबल एज्युकेशनल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवली जातो. ही ऍकॅडमी तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्ये देऊन, शैक्षणिक ज्ञान आणि कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या कौशल्यांमधील अंतर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते. कोल्हापूरमध्ये, एफएसए स्थानिक उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…