Home बँकिंग एचडीएफसी बँके तर्फे बचत खात्यांच्या शृंखलेत वाढ- ‘मॅक्स फॉर सिनियर्स’ आणि मॅक्स फॉर हर’ ची घोषणा

एचडीएफसी बँके तर्फे बचत खात्यांच्या शृंखलेत वाढ- ‘मॅक्स फॉर सिनियर्स’ आणि मॅक्स फॉर हर’ ची घोषणा

1 min read
0
0
11

no images were found

एचडीएफसी बँके तर्फे बचत खात्यांच्या शृंखलेत वाढ- ‘मॅक्स फॉर सिनियर्स’ आणि मॅक्स फॉर हर’ ची घोषणा

 मुंबई-   एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके तर्फे दोन नवीन सेव्हिंग्ज अकाऊट्सची सुरुवात केल्याची घोषणा केली.  ‘मॅक्स फॉर सिनियर्स’ आणि ‘मॅक्स फॉर हर’ अशी ही दोन उत्पादने असून याचा लाभ अनुक्रमे वरिष्ठ नागरिक आणि महिलांसाठी होणार आहे.  ‍ विशिष्ट  विभागांसाठी ही उत्पादने त्यांच्या महत्त्व पूर्ण अशा सेव्हिंग्ज मॅक्स श्रेणीतील असून ही श्रेणी प्रेफर्ड एन्ट्री लेव्हल सेव्हिंग्ज अकाऊंट्स पैकी असतील.

    नुकत्याची पीआयबी च्या   रिपोर्ट नुसार भारतातील वरिष्ठ नागरिकांची लोकसंख्या ही २०३६ पर्यंत २३० दशलक्षांवर पोहोचणार आहे, म्हणजेच संपूर्ण लोकसंख्येच्या १५ टक्के ही आकडेवारी असेल.  त्याच बरोबर सध्या महिला या एकूण बँक अकाऊंट्स पैकी ३९.२ टक्के खातेधारक आहेत, ही आकडेवारी एकूण ठेवींच्या ३९.७ टक्के आहे.   

    मॅक्स फॉर सिनियर्स आणि मॅक्स फॉर हर चे डिझाईन हे या विभागातील ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या गरजा पूर्ण करण्यासह क्षेत्रातील पहिले वैशिष्ट्य जसे सायबर फ्रॉड कव्हर, १ लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटलायझेशन कव्हर आणि अन्य सुविधा यामध्ये देण्यात येत आहेत.

    या उत्पादनातील महत्त्वपूर्ण अशा लाभांची* सूची खालीलप्रमाणे

 

मॅक्स फॉर सिनियर्स मॅक्स फॉर हर
·         रु. २५०००* पर्यंत यबर इन्शुरन्स कव्हर (डिजिटल फ्रॉड कव्हर) 

·         ऑटो स्वीप सुविधे अंतर्गत अधिकच्या बचत केलेल्या रकमेवर एफडी प्रमाणे व्याज

·         एफडी वर ०.५० टक्के अधिक व्याज *

·         डोअरस्टेप बँकिंग सुविधा

·         मोफत एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस*

·         डेबिट कार्डावर रु. ३.१९ कोटी रुपयांपर्यंतचा अपघाती विमा

·         डीमॅट अकाऊंटच्या पहिल्या वर्षाची फी माफ *

·         तुमच्या आवडीच्या ब्रॅन्ड्स कडून व्हाऊचर्स*

·         मोफत आरोग्य तपासणी *

·         मोफत एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस* 

·         ऑटो स्वीप सुविधे अंतर्गत अधिकच्या बचतीवर एफडी प्रमाणे अधिक व्याज

·         डेबिट कार्डावर रु. ३.१९ कोटी रुपयांपर्यंतचा अपघाती विमा

·         अकाऊंट वर १० लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा

·         लॉकर्स वर ५० टक्के सूट*

     या नवीन उत्पादना विषयी बोलतांना एफडीएफसी बँकेच्या ब्रॅन्च बँकिंग, पेमेंट्स, ट्रेझरी, लायबिलिटी प्रॉडक्ट्स, मार्केटिंग, व्हर्च्युअल चॅनल्स ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर चे ग्रुप हेड श्री. आशिष पार्थसारथी यांनी  सांगितले “ जसजसे जीवनशैलीत बदल होत असतात त्याप्रमाणे ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये ही बदल होऊ लागतात, बँकेने नेहमीच अशा वैविध्यपूर्ण ग्राहकांच्या गरजां नुसार त्यांच्यासाठी तयार करुन त्यांना मुल्याधारीत अनुभव देण्यावर भर दिला आहे. या नवीन उत्पादनांमुळे ग्राहकांना अधिक सुरक्षा, सोपेपणा आणि दीर्घकालीन वित्तीय सुरक्षेसाठी असलेली बँकेची वचनबध्दता अधोरखित झाली आहे.”    

     बँकेच्या वरिष्ठ नागरीक आणि महिलांसाठीच्या प्रिमियम स्पेशल सेव्हिंग्ज सूट मध्ये ग्राहक आता अधिक लाभ घेऊ शकतात, जसे अधिकचे साबयर कव्हर, विशेष लाईफस्टाईल प्रिव्हिलेजेस आणि अधिकचे लाभ मिळतील ज्यामुळे त्यांचा एकूण बँकिंग अनुभव अधिक समृध्द होऊ शकेल.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा

यादें ने साजरा केला 100 एपिसोड्सचा टप्पा सोनी सबचा हृदयस्पर्शी ड्रामा यादें ने 100 एपिसोड्…