Home Uncategorized बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे जयसिंगपूरमध्ये व्यसनमुक्ती कार्यशाळा

बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे जयसिंगपूरमध्ये व्यसनमुक्ती कार्यशाळा

1 second read
0
0
5

no images were found

बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे जयसिंगपूरमध्ये व्यसनमुक्ती कार्यशाळा
कोल्हापूर, :  शिवाजी विद्यापीठाचे लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य (कोल्हापूर जिल्हा) व निर्मल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जयसिंगपूर येथे एकदिवसीय व्यसनमुक्ती कार्यशाळा नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली.
जयसिंगपूर येथील गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयाच्या श्रीमती उज्ज्वला विनोद घोडावत सभागृहामध्ये झालेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील, प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ चंद्रशेखर हळींगळे, डॉ. माधुरी वंगपाटी, सुरेश सकटे, डॉ. सोनल मंगल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
चंद्रशेखर हळींगळे यांनी व्यसन व मनोसोपचार याबाबतची वैज्ञानिक माहिती विद्यार्थ्यांना दिली. डॉ. माधुरी वंगपाटी यांनी विद्यार्थ्यांना बालसमस्या, स्वमग्नता या बाबत माहिती दिली. विनायक कवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यसनमुक्तीविषयक नाटिका सादर केली. सुरेश सकटे यांनीही व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला परिसरातील विविध नऊ महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यशाळेच्या नियोजनासाठी अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रणील तोरस्कर यांनी आभार मानले.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

पाचट न जाळता कडधान्य व चारा पिकांचे आंतरपीक घ्या; पाण्याची ५० टक्क्यांपर्यंत बचत शक्य – जि…