Home राजकीय कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम, उपमहापौरसाठी जनसुराज्यचे अक्षय जरग

कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम, उपमहापौरसाठी जनसुराज्यचे अक्षय जरग

18 second read
0
0
27

no images were found

कोल्हापूरच्या महापौर पदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम, उपमहापौरसाठी जनसुराज्यचे अक्षय जरग

     कोल्हापूर(प्रतिनिधी):कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आली असल्याने या पंचवार्षीक मधील पहील्या महापौरपदी भाजपच्यावतीने रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा भाजपचे नेते मंत्री चंद्रकांतदादा पाटील यानी केली. भाजपचे जिल्ह्यातील नेते. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. उपमहापौरपदी जनसुराज्यशक्ती पक्षाने शिवसेना शिंदे गटाला पाठींबा दिल्याने जनसुराज्यमधून निवडून आलेले एकमेव नगरसेवक अक्षय विक्रम जरग यानां शिवसेना शिंदे गटाकडून संधी मिळाली.

        कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महानगरपालिकेत महायुतीला ८१ पैकी ४६ इतके स्पष्ट बहुमत आहे. यामध्ये भाजपचे २७ नगर सेवक आहेत. शिवसेना शिंदे गट १५, राष्ट्रवादी अजित पवार गट ४,यामध्ये जनसुराज्यने शिवसेना शिंदे गटाला पाठींबा दिल्याने या गटाचे संख्याबळ १६ झाले. विरोधी महविकास आघाडीत कॉंग्रेस ३४, शिवसेना उबाठा १ असे ३५ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.

        जास्त जागा असलेल्या भाजपकडे महापौरपद असल्याने भाजपच्यावतीने प्रभाग क्र.१८ मधून निवडून आलेल्या आणि यापूर्वी नगरसेवक म्हणून काम केलेल्या रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार रूपाराणी निकम यांचे नाव निश्चीत करण्यात आले असून स्थायी समिती सभापती पदही भाजपकडे रहाणार आहे. उपमहापौर आणि इतर विषय समिती सभापती पदे घटक पक्षाला मिळणार आहेत. जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी यासाठी. महापौर उपमहापौरपदे दर दहा महिण्याला बदलण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे.

       जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आ. विनय कोरे यांनी महापालिकेत शिंदे गटाला पाठींबा जाहीर केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेले उपमहापौरपद जनसुराज्यचे नगरसेवक अक्षय विक्रम जरग यानां देण्याचा निर्णय पालक मंत्री प्रकाश आबिटकर, आ राजेश क्षीरसागर यांनी घेतला.प्रभाग क्र. १० मधून निवडून आलेले अक्षय जरग यांचे वडील विक्रम जरग यांनीही कोल्हापूरचे उपमहापौरपद भूषवले आहे.यावेळी रुपाराणी निकम यांनी भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून संधी मिळत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगून शहराचा विकास आणि रखडलेले प्रश्न सोडवणे यावर भर देणार असल्याचे सांगीतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…