Home बँकिंग एचडीएफसी बँकेने नागरिकांना ‘बॉस स्कॅम’बाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले

एचडीएफसी बँकेने नागरिकांना ‘बॉस स्कॅम’बाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले

37 second read
0
0
10

no images were found

एचडीएफसी बँकेने नागरिकांना ‘बॉस स्कॅम’बाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले

मुंबई, : एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकेने ग्राहकांना बॉस स्कॅम (व्यावसायिक प्रमुख किंवा कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट रूप धारण करणे) बाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी अशा फसवणुकीबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.

बॉस स्कॅममध्ये, फसवणूक करणारे वरिष्ठ प्रमुख आणि विश्वासू सहकाऱ्यांचे रूप धारण करून सोशल मेसेजिंग अॅप्सवर कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी किंवा संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी फसवतात.

हा स्कॅम कसा काम करतो:

फसवणूक करणारे ईमेल किंवा सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मेसेज पाठवतात, ज्यामध्ये नियामक किंवा सीईओ आणि सीएक्सओ यांसारख्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बनावट रूप धारण केले जाते. या मेसेजमध्ये सहसा दावा केला जातो की, कंपनीने काही नियमांचे उल्लंघन केले आहे, ज्यामुळे तातडीची परिस्थिती निर्माण करून प्राप्तकर्त्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी दबाव आणला जातो. फसवणूक करणारे झिप (ZIP) फाईल शेअर करतात, ज्यामध्ये अनुपालन किंवा सुरक्षेशी संबंधित कागदपत्रे असल्याचे सांगितले जाते. ही फाईल उघडल्यावर शांतपणे मालवेअर इन्स्टॉल करते. हे मालवेअर अधिकाऱ्याच्या डिवाईसला (लॅपटॉप / मोबाईल) हॅक करते, ज्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या खऱ्या सोशल मीडिया मेसेजिंग अॅप खात्याचा अॅक्सेस मिळतो. हॅक केलेल्या खात्याचा वापर करून फसवणूक करणारे आर्थिक किंवा लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवतात आणि त्यांना तातडीने मोठे व्यवहार करण्याचे निर्देश देतात. काही केसेसमध्ये, गुन्हेगार हॅक केलेल्या डिवाईसवर स्वतःचे नंबर सीईओच्या नावाने सेव्ह करतात, ज्यामुळे फसवणुकीचे निर्देश पूर्णपणे वैध वाटतात.

बॉस स्कॅमपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी टिप्स

  • आर्थिक विनंत्यांची नेहमी स्वतंत्रपणे पडताळणी करा: कोणत्याही तातडीच्या पेमेंटच्या सूचना किंवा लाभार्थी खाते बदलण्याच्या विनंतीची थेट फोन कॉलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री करा.
  • अनोळखी फाईल्स कधीही इन्स्टॉल करू नका: अनोळखी स्रोतांकडून आलेल्या झिप (ZIP)/एक्झिक्युटेबल फाईल्स डाऊनलोड किंवा इन्स्टॉल करू नका, नियामक कधीही सोशल मीडिया अॅप्सद्वारे अटॅचमेंट्स पाठवत नाहीत.
  • कंपनीच्या सिस्टम्सवर सॉफ्टवेअर प्रतिबंध धोरणे लागू करा. डिवाईसची ऑपरेटिंग सिस्टम आणि मालवेअर शोधणारी साधने अद्ययावत (अपडेटेड) ठेवा.
  • फसवणुकीच्या किंवा संशयास्पद कॉल्स, मेसेजेसची तक्रार https://sancharsaathi.gov.in/ या चक्षू पोर्टलवर किंवा संचार साथी मोबाईल अॅपद्वारे करा.

या फसवणुकीबाबत इशारा देत एचडीएफसी बँकेचे क्रेडिट इंटेलिजन्स अँड कंट्रोलचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष श्री. मनिष अग्रवाल म्हणाले, “फसवणूक करणारे कंपन्यांची फसवणूक करण्यासाठी बॉस स्कॅम घटनांचा वापर करत आहेत, जिथे लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना (अधिकृत स्वाक्षरीकर्ते) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या बनावट सूचनांच्या बहाण्याने पैसे देण्यास प्रवृत्त केले जाते. अशा फसवणुकीविरुद्ध जागरूकता हेच सर्वात प्रबळ संरक्षण आहे. या स्कॅममध्ये कर्मचाऱ्यांना अनधिकृत निधी हस्तांतरण करण्यास फसवण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग, मालवेअर आणि बनावट रूप धारण करण्याच्या तंत्रांचा मिलाफ केला जातो. कंपन्यांनी व्यवहार प्रक्रियेत आणण्यापूर्वी सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन, कर्मचारी जागरूकता उपक्रम आणि पेमेंट विनंत्यांची पडताळणी यांवर कडक नियंत्रण सुनिश्चित केले पाहिजे. अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांना अशा मेसेजेसच्या प्रामाणिकतेची खात्री केल्याशिवाय केवळ टेक्स्ट / ईमेलच्या आधारे कोणतेही पेमेंट न करण्याचा सल्ला दिला पाहिजे.”

अशा फसवणुकीला बळी पडल्यास, पीडित व्यक्तीने भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पेमेंट चॅनेल म्हणजेच कार्ड्स/यूपीआय/नेट बँकिंग ब्लॉक करण्याकरिता बँकेला अनधिकृत व्यवहारांची त्वरित माहिती दिली पाहिजे. ग्राहकांनी गृह मंत्रालयाने (एमएचए) सुरू केलेल्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवली पाहिजे, तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल https://www.cybercrime.gov.in वर तक्रार केली पाहिजे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा…