Home धार्मिक व्हिजिट माय स्टेट’ मोहिमेंतर्गत ब्रज पर्यटन सर्किटला चालना देण्यासाठी युपीएसटीडीसीकडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजचा शुभारंभ

व्हिजिट माय स्टेट’ मोहिमेंतर्गत ब्रज पर्यटन सर्किटला चालना देण्यासाठी युपीएसटीडीसीकडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजचा शुभारंभ

9 second read
0
0
10

no images were found

‘व्हिजिट माय स्टेट’ मोहिमेंतर्गत ब्रज पर्यटन सर्किटला चालना देण्यासाठी युपीएसटीडीसीकडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजचा शुभारंभ

  • जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर युपीएसटीडीसीकडून ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजची सुरुवात
  • ब्रजच्या पवित्र वारशाची पर्यटकांना अनुभूती देण्यासाठी युपीएसटीडीसीकडून तीन दिवसीय ‘कृष्ण लीला’ पर्यटन सहलीचे अनावरण
  • ‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजमुळे कृष्ण-ब्रज पर्यटन सर्किट आणि आध्यात्मिक पर्यटनाला बळकटी – जयवीर सिंह

जन्माष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाने (यूपीएसटीडीसी) ‘कृष्ण लीला’ या पर्यटन पॅकेजचा शुभारंभ केला आहे. भाविकांसाठी आध्यात्मिक पर्यटन अधिक सोयीचे आणि परवडणारे व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तीन दिवस आणि दोन रात्रींच्या या पर्यटन पॅकेजमध्ये मथुरा, वृंदावन, गोकुळ आणि बरसाना या पवित्र स्थळांचा समावेश आहे. दरम्यान ब्रजभूमीतील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या पर्यटन टूरची सुरुवात सकाळी ८.०० वाजता लखनऊ येथून सुरू होईल.

या उपक्रमाबाबत पर्यटन व संस्कृती मंत्री जयवीर सिंह म्हणाले, “‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज हे ‘व्हिजिट माय स्टेट उत्तर प्रदेश’ अभियानाच्या उद्दिष्टांना पुढे नेणारे आहे. या माध्यमातून देशभरातील पर्यटकांना राज्याच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाची ओळख करून देण्यास प्रोत्साहन मिळेल. तसेच कृष्ण-ब्रज पर्यटन मार्गिकेला अधिक बळकटी मिळून भाविकांसाठी तीर्थयात्रआ अधिक सुलभ होईल.”

ते पुढे म्हणाले, “२०२५ मध्ये मथुरेला १०.२४ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. तसेच ब्रज रंगोत्सव २०२५ मध्ये ४४ लाखांहून अधिक पर्यटक सहभागी झाले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत जवळपास १.९० कोटी पर्यटकांनी ब्रजला भेट दिली आहे. यावरून ब्रज हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय आध्यात्मिक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट होते.”

कुटुंबे आणि छोट्या समूहांसाठी हे पर्यटन पॅकेज तयार करण्यात आले आहे. वातानुकूलित सेडान आणि क्रिस्टा वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पॅकेजसाठी किमान दोन पर्यटक आवश्यक आहेत. सेडान वाहनासाठी प्रतिव्यक्ती १०,४०० रुपये, तर क्रिस्टा वाहनासाठी प्रतिव्यक्ती १०,१५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

या पर्यटन पॅकेजमध्ये निवास, नाश्ता, अल्पोपाहार, हाय-टी, मार्गदर्शकासह स्थळदर्शन, स्थानिक प्रवासाची सुविधा तसेच आवश्यक सहाय्यक सेवांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांना नियोजनबद्ध आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. दुपारचे आणि रात्रीचे भोजन यासाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाईल.

तीन दिवसांच्या या पर्यटन कार्यक्रमादरम्यान ब्रजमधील प्रसिद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर, रंगजी मंदिर, निधिवन, वैष्णो देवी मंदिर आणि अक्षय पात्र मंदिराला भेट दिली जाईल. दुसऱ्या दिवशी मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी, द्वारकाधीश मंदिर, विश्राम घाट, भूतेश्वर मंदिर तसेच गोवर्धन या ठिकाणांना भेट देण्यात येईल.तिसऱ्या दिवशी बरसाना येथील राधाराणी मंदिर, इस्कॉन मंदिर आणि श्री राधा दामोदर मंदिराला भेट दिल्यानंतर लखनऊकडे परतीचा प्रवास सुरू होईल.

यूपीएसटीडीसी चे अध्यक्ष अमृत अभिजात म्हणाले, “‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेज पर्यटकांना सुखकर आणि समृद्ध तीर्थक्षेत्राचा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून ब्रज प्रदेशातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक समृद्धीची ओळख व्यावसायिक पद्धतीने नियोजित पर्यटन सेवांद्वारे पर्यटकांना करून देण्यात येणार आहे.”

‘कृष्ण लीला’ पर्यटन पॅकेजच्या बुकिंगसाठी आणि अधिक माहितीसाठी पर्यटक ९१४९०९९८९० किंवा ७९८५८१६४६७ या क्रमांकांवर यूपीएसटीडीसी शी संपर्क साधू शकतात.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणा…