Home शासकीय श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यास एक हजार कोटींचा निधी द्यावा: राजेश क्षीरसागर 

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यास एक हजार कोटींचा निधी द्यावा: राजेश क्षीरसागर 

1 second read
0
0
24

no images were found

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यास एक हजार कोटींचा निधी द्यावा: राजेश क्षीरसागर 

मुंबई  : कोल्हापूर येथील श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे देशातील ५१ शक्तीपिठापैकी एक प्रमुख पीठ आहे. या मंदिरास दरवर्षी कोट्यावधी भाविक दर्शनाकरिता देश परदेशातून येत असतात. महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या जागृत असणाऱ्या या मंदिराची स्थापना सुमारे ८०० वर्षापेक्षा अधिक वर्षापूर्वीची असून या पुरातन मंदिराची वास्तुरचना हेमाडपंथी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरात नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या कालावधीत सुमारे २५ लाखापेक्षा अधिक भाविक देशभरातून दर्शनाकरीता येतात. कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. याकरिता मंदिराचा सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत सुरु असून, अंतिम टप्यात आहे. या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास तात्काळ मंजुरी देवून एक हजार कोटींच्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे केली. यावेळी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना सदर आराखडा तपासून सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेवून निधी मागणीचे निवेदन सादर केले.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी सादर केलेल्या निवेदनामध्ये, कोल्हापूर येथील श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर हे राज्यातील साडेतीन शक्तिपीठा पैकी एक मुख्य पीठ असून दररोज लाखो भाविक देवीच्या मंदिरात येत असतात. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यामुळे परराज्यातूनही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात सणासुदीच्या दिवसामध्ये हि संख्या ५ लाखपर्यंत असते. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक दळणवळणाची साधने व पायाभूत सुविधांचा विकास झाले असलेने दिवसागणिक भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे त्यामुळे मंदिर परिसरातील उपलब्ध सोयीसुविधा तोकड्या पडत आहेत. मंदिर परिसर शहराच्या मध्यवर्ती असून आजूबाजूला मोठ्या बाजारपेठा व निवासी संकुलाची निर्मिती झालेली आहे. मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेता मंदिराचा विकास वाराणसी व मथुरा येथील मंदिराच्या धर्तीवर करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु आहेत. कोल्हापूर येथील श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर मंदिराचा सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम टप्यात आहे. मंदिर परिसर हा लोकवस्तीने, व्यावसायिक दुकानांमुळे तसेच छोटे फेरीवाले यांच्यामुळे गजबजलेला असल्याने सदरचा परिसर नागरिकांचेवर कोणताही अन्याय न होता भूसंपादित करणे आवश्यक आहे. याकरिता परिसर विकासासोबतच भूसंपादानासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी पार्किंगची, राहण्यासाठी भक्त निवासी संकुल, त्यासोबतच भाविकांसाठी दर्शन मंडप, सभा मंडप, विश्रांतीगृह यासारख्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर मंदिराचा सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत अंतिम टप्यात असून त्याकरिता १ हजार कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे. तरी कृपया श्री.करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर मंदिराचा सविस्तर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देऊन त्याकरिता आवश्यक १ हजार कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी श्री.क्षीरसागर यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिवांना सदर आराखडा तपासून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…