no images were found
शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कोल्हापूर, (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यदिन शिवाजी विद्यापीठात आज मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक ८ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने संचलन करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. राष्ट्रगीतासह महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्प वाहून मान्यवरांसह उपस्थितांनी अभिवादन केले. यानंतर विद्यापीठ परिसरातून विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने मोठ्या जल्लोषी वातावरणात तिरंगा रॅली काढण्यात आली. यामध्ये मान्यवरांस शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी राष्ट्रध्वज घेऊन सहभागी झाले. त्याचप्रमाणे यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता. तिथेही उपस्थितांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढण्यास मोठा प्रतिसाद दर्शविला. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. ज्योती जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य स्वागत परूळेकर यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.