शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण; गुणवंत विद्यार्थ्यांसह कर्तृत्ववानांचा गौरव कोल्हापूर प्रतिनिधी : म्हाळुंगे : करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथील श्रीमंत राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयात ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. निगवे गावचे सुपुत्र शहीद जवान संग्राम पाटील यांच्या वीरपत्नी हेमलता पाटील (ताई) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहीद जवानाच्या वीरपत्नीच्या हस्ते झालेल्या ध्वजारोहणामुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि …