Home बँकिंग एचडीएफसी बँकेचा 1.75 अब्ज डॉलरचा परदेशी बाँड इश्यू; जागतिक  आर्थिक संकटानंतर भारतीय बँकेची सर्वात मोठी निधी उभारणी

एचडीएफसी बँकेचा 1.75 अब्ज डॉलरचा परदेशी बाँड इश्यू; जागतिक  आर्थिक संकटानंतर भारतीय बँकेची सर्वात मोठी निधी उभारणी

5 second read
0
0
4

no images were found

एचडीएफसी बँकेचा 1.75 अब्ज डॉलरचा परदेशी बाँड इश्यू; जागतिक  आर्थिक संकटानंतर भारतीय बँकेची सर्वात मोठी निधी उभारणी

नवी दिल्ली,: – एचडीएफसी बँकेने आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी परदेशी बाँडच्या माध्यमातून 1.75 अब्ज डॉलर उभारले आहेत. एचडीएफसी बँकेच्या GIFT सिटी शाखेमार्फत 1.75 अब्ज डॉलरचे वरिष्ठ असुरक्षित बाँड (सीनियर अनसिक्युअर्ड बॉन्ड) जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती बँकेने नियामकांना दिलेल्या अहवालात सांगितली. जागतिक आर्थिक संकटानंतर एखाद्या भारतीय बँकेने उभारलेला हा सर्वात मोठा निधी आहे. या बाँड इश्यूला आशिया, अमेरिका आणि युरोपमधील गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.  

खासगी क्षेत्रातील या बँकेने 50 कोटी डॉलरचे बाँड 5.16 टक्के व्याजदराने (कूपन रेट) जारी केले असून, त्याची मुदत 3 वर्षांची आहे. उर्वरित 1.25 अब्ज डॉलरचे पाच वर्षांच्या मुदतीचे बाँड असून, त्यावर 5.4 टक्के व्याजदर (कूपन रेट) देण्यात येणार आहे. हे बाँड इंडिया आयएनएक्स (इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (आयएफएससी) लिमिटेड) आणि एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंज (एनएसई-आयएक्स) येथे सूचीबद्ध केले जाणार आहेत.

एचडीएफसी बँकेने जूनपासून आतापर्यंत डॉलर बाँडच्या माध्यमातून 2.5 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. जूनमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एफसीएनआर (FCNR) सुविधा सुरू केल्यानंतर, अशा प्रकारे सर्वाधिक निधी उभारणारी एचडीएफसी बँक आता आघाडीची कर्जदाता बँक ठरली आहे. बाँडची आकर्षक किंमत, अपेक्षेपेक्षा जास्त मागणी आणि जगभरातील गुंतवणूकदारांपर्यंत पोहोच यावरून गुंतवणूकदारांचा एचडीएफसी बँकेवरील विश्वास दिसून येतो, असे विश्लेषकांनी सांगितले.

भारतीय रिझर्व्ह बँकेने लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एलआयसी) एचडीएफसी बँकेतील 9.99 टक्क्यांपर्यंतचा हिस्सा खरेदी करण्यास मंजुरी दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निधी उभारण्यात आला. 14 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, एलआयसी कडे एचडीएफसी बँकेच्या एकूण भागभांडवलापैकी 4.11 टक्के हिस्सा आहे. एलआयसीने आरबीआयकडे केलेल्या अर्जाच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे, असे एचडीएफसी बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे. एलआयसीव्यतिरिक्त अनेक मोठ्या ब्रोकर्सनीही एचडीएफसी बँकेच्या शेअरसाठी ‘’बाय’ (खरेदी) रेटिंग कायम ठेवले आहे. यावरून गुंतवणूकदारांचा बँकेवरील मजबूत विश्वास असल्याचे दिसून येते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In बँकिंग
Comments are closed.

Check Also

उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर

उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर:-डी. वाय. पाटील वि…