Home मनोरंजन आजोबांचं पुस्तक ते आजीची साडी, पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी शेअर केलेल्या कौटुंबिक आठवणी 

आजोबांचं पुस्तक ते आजीची साडी, पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी शेअर केलेल्या कौटुंबिक आठवणी 

9 second read
0
0
7

no images were found

आजोबांचं पुस्तक ते आजीची साडी, पुष्पा इम्पॉसिबलच्या कलाकारांनी शेअर केलेल्या कौटुंबिक आठवणी 

सोनी सबचं पुष्पा इम्पॉसिबल कुटुंब, नाती आणि कठीण निर्णयांशी जोडलेल्या अनेक भावना दाखवतं. सध्याच्या कथानकात शनाया (मुस्कान बामने) कुटुंबाची मालमत्ता विकण्याचा कठीण निर्णय घेते, ज्यातून पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या वस्तूंचं भावनिक महत्त्व अधोरेखित होतं.कथानकात कौटुंबिक वस्तूंचं महत्त्व आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी दाखवल्या जात असताना, कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील खास वारसा सांगितला. त्यांच्या दृष्टीने या वस्तूंचं मूल्य पैशाने ठरत नाही, तर त्या वस्तूंशी जोडलेल्या माणसांनी, आठवणींनी आणि कहाण्यांनी ठरतं.कौटुंबिक वारशाबद्दल बोलताना पुष्पाची भूमिका साकारणाऱ्या करुणा पांडे यांनी सांगितलं, “माझ्यासाठी कौटुंबिक वारसा खास आहे कारण त्याच्याशी जोडलेल्या कहाण्या आणि भावना महत्त्वाच्या आहेत. ती एखादी साधी वस्तू असू शकते जी वर्षानुवर्षं कुटुंबात आहे, पण ती कुठून आली आणि कोणाची होती हे समजलं की ती आपोआप मौल्यवान होते. मला वाटतं अशा छोट्या गोष्टी आपल्या आठवणी आणि कौटुंबिक कहाण्या जिवंत ठेवतात.”

       शनायाची भूमिका साकारणारी मुस्कान बामने म्हणाली, “माझ्याकडे आजोबांचं एक पुस्तक आहे, जे माझ्या मनाजवळ खूप खास आहे. ते साधं वाटू शकतं, पण ते त्यांचं होतं आणि आमच्या कुटुंबात जपलं गेलं आहे ही गोष्ट त्याला खास बनवते. ते पाहिलं की मला नेहमी त्यांची आठवण येते आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी जाग्या होतात.”

      चिरागची भूमिका साकारणारा नितीन बाबू म्हणाला, “माझ्यासाठी खूप भावनिक मूल्य असलेली वस्तू म्हणजे आमच्या कुटुंबात पिढ्यान्‌पिढ्या जपलेलं चरखं. ही वस्तू आमच्या कुटुंबाची आहे आणि वर्षानुवर्षं पुढे दिली गेली आहे. माझ्या दृष्टीने हाच खरा वारसा आहे, कारण तो फक्त एक वस्तू नसून आपल्या कुटुंबाच्या इतिहासाचा एक छोटा भाग आहे. मला तो पुढे नेण्याची संधी मिळते, हीच गोष्ट त्याला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण बनवते.”

     दीप्तीची भूमिका साकारणारी दीक्षा जोशी यांनी सांगितलं, “माझ्या आजीची साडी माझ्यासाठी खूप खास आहे. ती आधी माझ्या आईने घातली होती आणि नंतर मी कॉलेजमध्ये असताना मला तीच साडी घालण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्या साडीत माझ्या आई आणि आजी दोघींच्या आठवणी आहेत, ज्यामुळे ती माझ्यासाठी आणखी मौल्यवान झाली आहे.”

      राशीची भूमिका साकारणारी अक्षया हिंदळकर यांनी सांगितलं, “माझ्या सासूबाईंनी मला एक पैंजण दिलं, जे त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलं होतं. त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच पिढ्यान्‌पिढ्या प्रवास करून आलं आहे. ही वस्तू माझ्यासाठी खूप खास आहे कारण त्यातून आमच्या कुटुंबातील स्त्रियांमध्ये एक सुंदर नातं जोडलेलं आहे. मला ही परंपरा पुढे चालू ठेवायची आहे, हीच गोष्ट त्याला आणखी मौल्यवान बनवते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर

उर्जेची बचत व कार्यक्षम वापरातूनच शाश्वत कृषी विकास शक्य : दिनेश कन्नोर:-डी. वाय. पाटील वि…