नार्वेकरांनी निर्ल्लज्जपणाचा कळस गाठला! -उद्धव ठाकरे
मुंबई, – ‘निवडणूक आयोगाने दिलेला निकाल चुकीचा आहे, त्याला आम्ही सुप्रिम कोर्टात आव्हान दिलं आहे. तो निर्णय त्यांनी (म्हणजेच विधानसभा अध्यक्षानी) ग्राह्य धरला आहे. म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे. निर्लज्जपणाचा कळस त्यांनी गाठला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो अपमान केला आहे त्याबद्दल अवमान याचिका दाखल करता येते का हे आम्ही बघणार आहोत’ अशी तीव्र प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
विधानसभा अध्यक्षानी दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेवून राहूल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. लोकशाहीची हत्त्या, आदित्य कडाडले उद्धव ठाकरेंप्रमाणेच आदित्य ठाकरे यांनीदेखील निकालावर टीका केली आहे. लोकशाहीचा खुन झाला आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.