no images were found
ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती
कोल्हापूर : एसूस इंडियाने आपल्या एक्स्पर्ट सिरिज पीसींच्या ‘बिल्ट फॉर वरीफ्री बिझनेस ’ या वचनाला अधिक बळकटी देण्यासाठी MSME तज्ज्ञ आणि क्वांटम लीपचे संस्थापक राजीव तलरेजा यांची MSME विभागासाठी मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय MSME समुदायाला जागतिक स्तरावरील क्षमतांनी सक्षम करण्याच्या समान दृष्टिकोनातून ही दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे.
या सहकार्याद्वारे MSME उद्योजकांना व्यवसायासाठी योग्य तंत्रज्ञानाची निवड, व्यावसायिक दर्जाच्या PCचे महत्त्व आणि तंत्रज्ञानातील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. क्वांटम लीपच्या माध्यमातून राजीव तलरेजा यांनी १२ लाखांहून अधिक व्यवसाय मालकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे MSME क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा ASUSला फायदा होणार आहे.
लहान व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी टिकाऊपणा, कार्यक्षमता, अपग्रेड क्षमता, बॅटरी बॅकअप, सुरक्षा आणि विक्रीनंतरची सेवा महत्त्वाची असते. या गरजा लक्षात घेऊन एसूस एक्स्पर्ट सिरिज विकसित केली आहे. दीर्घकालीन वापर, कमी डाउनटाइम आणि अधिक कार्यक्षमतेमुळे व्यवसायांचा एकूण मालकी खर्च कमी करण्यास या मालिकेतील उपकरणे मदत करू शकतात.
या भागीदारीपूर्वी राजीव तलरेजा आणि त्यांच्या टीमने एसूस एक्स्पर्ट सिरीज ची उपकरणे प्रत्यक्ष वापरून त्यांची उपयुक्तता तपासली. MSME समुदायामध्ये करण्यात आलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणातूनही व्यावसायिक दर्जाच्या PCची गरज अधोरेखित झाली.
ASUS कमर्शियल PC बिझनेसचे भारत, श्रीलंका आणि नेपाळचे उपाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी सांगितले की, AIच्या युगात PC हे व्यवसायाच्या यशासाठी महत्त्वाचे साधन बनले असून, भारतीय MSMEना सुरक्षित, उच्च-कार्यक्षम आणि लवचिक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ASUS कटिबद्ध आहे. या सहकार्यामुळे MSMEच्या बदलत्या गरजांनुसार ASUSला उत्पादने आणि सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्यपूर्ण अभिप्राय मिळणार आहे.