no images were found
चैत्र पौर्णिमेचा निमिताने अंबाबाईची नगरप्रदक्षिणा
कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतीबा देवाच्या चैत्रातील यात्रेच्या दुसाऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री कोल्हापूरकर आणि अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या अंबाबाई देवीनं भक्तांच्या भेटीसाठी मंदीर सोडलं.अर्थात देवी भक्तांच्या भेटीसाठी मंदिराबाहेर बाहेर पडते, यालाच नगरप्रदक्षीणा असंही म्हटलं जातं. जोतीबाला आलेल्या भक्तांना अंबाबाई देवीचं दर्शन घेता यावं या उद्देशानं सुरु झालेली हि परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरु आहे. राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी 1914 साली अंबाबाई देवीची नगरप्रदक्षीणा काढण्याची परंपरा सुरु केली. तेव्हापासुन आजपर्यंत जोतीबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाई देवीची नगरप्रदक्षिणा काढली जाते.
यंदा नव्याने बनविण्यात आलेला सागवानी लाकडाचा रथ सार्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रथोत्सव मार्गावर उच्चांकी गर्दी झाली होती. रात्री साडेनऊ वाजता अंबाबाई मंदिरात तोफेची सलामी देण्यात आली. त्यानंतर महाद्वारात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते रथातील उत्सवमूर्तीचे पूजन झाले. यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी आई आंबाबई साठी तयार करण्यात आलेल्या नव्या रथाचे पूजन मला करायला मिळालं हे माझं भाग्य समजतो अशी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रला आई आंबाबईचा आशीर्वाद मिळो आणि राज्याचा विकास होवो अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर-देसाई, श्रीपूजक, मानकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरुवात झाली. पोलिस दलाच्या बॅण्ड पथकाने रथोत्सवाला सलामी दिली.
नगरप्रदशिणा मार्गावर भक्तांनी अंबाबाई देवीवर फुलांची उधळण केली. त्याचबरोबर फटक्यांची आतषबाजी करत देवीचं स्वागत करुन दर्शनही घेतलं. यंदाच्या वर्षीही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यादरम्यान गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अंबाबाई देवीचा नवीन रथ मंदिरातुन बाहेर पडला. देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर भक्तांमार्फत फुलांच्या पायघड्या घालुन रांगोळी काढण्यात आली होती. पारंपारीक वाद्याच्या गजरात आणि पोलीस बॅन्डच्या गजरात नगरप्रदक्षिणेला सुरवात झाली. त्यानंतर , गुजरी, भवाणी मंडप, मिरजकर तिकटी मार्गे हा रथोत्सव पुढे मार्गस्थ झाला.