Home आरोग्य महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८०३ कोरोना रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८०३ कोरोना रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

0 second read
0
0
68

no images were found

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८०३ कोरोना रुग्णांची नोंद, ३ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात करोनाचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसतं आहे. ही वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे. राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, गेल्या 24 तासात राज्यात ८०३ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच, काल तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुंबई, ठाणे व जालन्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ८१ लाख ४७ हजार ६७३ वर गेली आहे तर आतापर्यंत एक लाख ४८ हजार ४५४ जणांना कोरोनामुळे मृत्य झाला आहे.

मागील २४ तासांमध्ये ६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण ७९ लाख ९५ हजार २३२ करोना रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ९८.१३ टक्के इतका आहे. दिवसभरात ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. २४ तासांमध्ये तीन करोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर १.८२ टक्के इतका आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एकूण ८ कोटी ६६ लाख ७५ हजार ७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१ लाख ४७ हजार ६७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांचं स्क्रिनिंग करण्यात येतं आहे अशीही माहिती सरकारने आपल्या अहवालात दिली आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणी विदेशातून येणाऱ्या नागरिकांचं स्क्रिनिंग करण्यात येतं आहे. २४ डिसेंबर २०२२ पासूनच हे स्क्रिनिंग सुरू करण्यात आलं आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…