Home आरोग्य योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री

योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री

13 second read
0
0
11

no images were found

योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री
-‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन-डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी):-योग्य आहार, नियमित व्यायाम व पुरेशी झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री असल्याचे प्रतिपादन लॉरस लॅब चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सत्यनारायण चावा यांनी केले डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित भारतीय आरोग्य यंत्रणेतील संधी आणि आव्हाने त्याचबरोबर हेल्दी एजिंग (सुदृढ वृद्धत्व)या विषयावर डॉ. चावा यांनी मार्गदर्शन केले.

      कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी डॉ. चावा यांचे स्वागत केले. यावेळी डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती ऋतुराज संजय पाटील, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

     डॉ. चावा म्हणाले, सध्या भारतीय नागरिकांचे सरासरी आयुष्यमान वाढत आहे, दुसरीकडे जन्मदर घटत आहे, हे आरोग्य क्षेत्रातील भारतासमोरच सर्वात मोठे आव्हान आहे. आपल्या देशात इतर देशाच्या तुलनेत डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडची संख्या कमी आहे. २०४७ मध्ये विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि संशोधन यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.

     हेल्थ केअर क्षेत्र झपाट्याने वाढत असून मेडिकल टुरिझमलाही मोठी संधी आहे. भविष्यात आरोग्य क्षेत्रात वेअरेबल डिव्हाईस, ई- कन्सल्टन्सी असे बदल होणार असून तंत्रज्ञानाचा वापर वाढून मानवी आरोग्य आणि जीवन अधिक सुलभ होईल. आरोग्य क्षेत्रातील संधी वाढतच जाणार असून विद्यार्थ्यानी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे.

     ‘हेल्थी एजिंग’वर बोलताना वय का वाढते, काय बदल होतात, बायोलॉजिकल बदल आदींविषयी सविस्तर माहिती दिली. एजिग हा आजार असून त्यावर कोणतेही औषध नाही. व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हीच आरोग्यमय दीर्घायुष्याची त्रिसूत्री आहे, असा कानमंत्र दिला.

      यावेळी डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, आय क्यू ए सी डायरेक्टर डॉ. शिंपा शर्मा, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. सी डी लोखंडे, डॉ. अमृतकुंवर रायजादे, डॉ. अजित पाटील, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अर्पिता तिवारी यांच्यासह विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम

शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर सौ. रूपाराणी निकम कोल्हापूर,&nb…