Home पर्जन्य राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

14 second read
0
0
47

no images were found

राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

 

    कोल्हापूर,  :  राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून धरणाच्या एकूण  स्वयंचलित 7 दरवाजांपैकी 4 दरवाजे बंद झाले आहेत. सध्या 3 दरवाजे खुले आहेत.

    विसर्ग – धरणाची एकूण 3 द्वारे (क्र. 3, 6 व 7) उघडली आहेत. स्वयंचलित द्वार क्र. 3, 6 व 7 मधून  4284 क्युसेक्स व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक्स असा एकूण 5784 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.

        अलमट्टी धरणाचा विसर्ग आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 2 लाख क्यूसेक्स वरुन 2 लाख 50 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे..

  जिल्ह्यातील पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 39 फुटावर इशारा पातळी मानली जाते. पहाटे पाच वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी 39 फूट झाली असून बुधवारी पहाटेपासून इशारा पातळीवरुन नदीचे पाणी वाहत आहे. सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 40 फुटांवर आहे.

    पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्जन्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…