Home उद्योग अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

18 second read
0
0
8

no images were found

अदाणी डिफेन्स ची भारतीय वायुसेने साठी पुढील पिढीच्या हवाई निगराणी कार्यक्रमासाठी डीआरडीओ सोबत भागीदारी

अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) यांनी भारतीय वायुसेनेसाठी (IAF) पुढील पिढीच्या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C-MKII) कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण करार केला आहे. ही भागीदारी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला अधिक बळ देणारी आहे.

या करारानुसार, अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि डीआरडीओ मिळून भारतीय वायुसेनेसाठी सहा सुधारित एअरबस A321 विमानांवर अत्याधुनिक एअरबोर्न मिशन सिस्टीम विकसित करणार, तयार करणार आणि त्यांचे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) करणार आहेत. या प्रकल्पात पुढील 30 वर्षांसाठी देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल (MRO), तांत्रिक सहाय्य आणि इंटिग्रेटेड लॉजिस्टिक सपोर्ट यांचाही समावेश आहे. 2032-33 पर्यंत AEW&C-MKII विमान भारतीय वायुसेनेत दाखल करण्याचे नियोजन आहे.

या भागीदारीमुळे मिशन सिस्टीम आणि संरक्षण संशोधनातील डीआरडीओचे कौशल्य तसेच प्रगत उत्पादन, सिस्टीम इंटिग्रेशन आणि दीर्घकालीन तांत्रिक सहाय्य यातील अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेसची क्षमता एकत्र येणार आहे. यामुळे भारतातील सर्वात आधुनिक स्वदेशी एअरबोर्न सर्व्हिलन्स प्लॅटफॉर्मपैकी एक विकसित होण्यास मदत होणार आहे.

AEW&C विमानांना अनेकदा “आकाशातील डोळे” असे म्हटले जाते. आधुनिक हवाई युद्धात ही विमाने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. ती लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकतात, संभाव्य धोक्यांचा लवकर शोध घेऊ शकतात आणि रिअल-टाइममध्ये कमांड व कंट्रोलची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे लष्करी कारवायांमध्ये जलद, अचूक आणि माहितीच्या आधारे निर्णय घेणे शक्य होते. AEW&C-MKII मुळे भारतीय वायुसेनेची परिस्थितीची अचूक माहिती मिळवण्याची क्षमता, दलांमधील समन्वय आणि नेटवर्क-आधारित लष्करी कारवायांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

या कार्यक्रमामुळे अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे, जिच्याकडे या स्तरावरील आणि अत्यंत गुंतागुंतीच्या एअरबोर्न मिशन प्लॅटफॉर्मच्या विकास, इंटिग्रेशन आणि संपूर्ण कार्यकालीन तांत्रिक सहाय्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सध्या अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, चीन आणि स्वीडन या पाच देशांकडेच स्वदेशी AEW&C क्षमता आहे. AEW&C-MKII मुळे भारताचाही या निवडक देशांच्या गटात समावेश होणार आहे. हे विमान भारतीय वायुसेनेच्या इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टीम (IACCS) शी जोडली जाणार आहे. ही प्रणाली देशभरातील हवाई देखरेख, हवाई संरक्षण आणि लष्करी कारवायांचे रिअल-टाइम समन्वय साधणारे महत्त्वाचे कमांड नेटवर्क आहे. या एकत्रीकरणामुळे जलद निर्णय घेण्याची क्षमता वाढेल, रणांगणावरील सातत्यपूर्ण समन्वय साधता येईल आणि लष्करी कारवायांना अधिक वेगवान व प्रभावी प्रतिसाद देता येईल. त्यामुळे भारताची हवाई संरक्षण व्यवस्था आणखी मजबूत होईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग
Comments are closed.

Check Also

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी न…