
no images were found
वेडिंग सीनमध्ये सरप्राईझ आणि ट्विस्ट्स उलघडणार
शेमारू मराठीबाणाची मालिका सौ. प्रताप मानसी सुपेकर मध्ये येत आहे एक अनोखा ट्विस्ट. प्रताप आणि मानसी ह्यांची जोडी, त्यांच्या लग्नाच्या प्रवासासाठी सज्ज असल्यामुळे अपेक्षा नवीन उंची गाठत आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नाच्या दृश्यांमध्ये भावनांची चढाओढ दिसणार आहे, तसेच प्रखर आणि आकर्षक कामगिरी ह्या सीन्स दरम्यान दिसण्यात येणार आहे.
या मालिकेमध्ये प्रतापची भूमिका साकारणारे प्रदीप घुले लग्नाच्या कथानकाविषयी सांगत म्हणतात, प्रतापने सौरभला अप्रामाणिक माणूस म्हणून समोर आणल्यानंतर, परिस्थितीमुळे प्रताप आणि मानसीचे लग्न मंडपात अनपेक्षितपणे पार पडले, ज्यामुळे पाहुण्यांना धक्का बसला. दोघांनाही एकमेकांबद्दल भावना होत्या पण ते दोघे कबूल
करू शकले नव्हते. पण आता परिस्थितीने त्यांना एकत्र आणले आहे. या ट्विस्टमुळे, प्रताप आणि मानसी यांचा वैवाहिक प्रवास गोंधळलेल्या परिस्थितीतून सुरू झाल्याने प्रेक्षकांना नक्कीच आणखी आश्चर्य वाटणार आहे. सौ. प्रताप मानसी सुपेकर मधील रोमांचक ट्विस्टसाठी सज्ज व्हा. लग्नाची चर्चा जसजशी तीव्र होत जाते, तसतसे प्रदीप घुलेचे पात्र, प्रताप, लक्ष वेधून घेते, रहस्ये उलगडून दाखवते आणि सस्पेन्ससाठी स्टेज सेट करते.
सौ. प्रताप मानसी सुपेकर मधील प्रताप आणि मानसीच्या प्रवासाचा एक भाग व्हा, दर सोमवार ते शनिवार रात्री ९.०० वाजता, फक्त शेमारू मराठीबाणा वर.