Home मनोरंजन सायकल चालवल्याने त्यांना कसे रीचार्ज झाल्यासारखे वाटते!

सायकल चालवल्याने त्यांना कसे रीचार्ज झाल्यासारखे वाटते!

8 second read
0
0
54

no images were found

सायकल चालवल्याने त्यांना कसे रीचार्ज झाल्यासारखे वाटते!

या जागतिक सायकल दिनी, सोनी सबचे उत्साही कलाकार शब्बीर अहलूवालिया, नवीन पंडिता, शीहान कपाही आणि देशना दुगड सांगत आहेत, सायकल चालवून मिळणाऱ्या मौज, फिटनेस आणि स्वातंत्र्याविषयी. या कलाकारांसाठी सायकल हे केवळ प्रवास करण्याचे साधन नाही, तर सायकल चालवणे हा त्यांचा आवडीचा विषय आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळते, मन स्वच्छ होते आणि व्यक्त जीवनात एक वेगळाच आनंद मिळतो. शब्बीर तर सेटवरच सायकल घेऊन येतो, किंवा नवीन सायकलवरून लांब फेरफटका मारून निसर्गाचा आनंद घेतो, देशना स्क्रीन-टाइम टाळून सायकल चालवत स्वतःमध्ये रमते तर शीहानची सायकलशी निगडीत एक हृदयस्पर्शी आठवण आहे. प्रत्येक जण सांगत आहे की, सायकल हा कसा त्यांच्या जीवनातील एक अर्थपूर्ण भाग बनला आहे. बघू ते काय सांगताहेत-

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत युगची भूमिका साकारत असलेला शब्बीर अहलूवालिया म्हणतो, “माझ्यासाठी तर सायकल गेमचेंजर आहे. मी आठवड्यातून किमान दोन वेळा सायकलवरूनच सेटवर येतो. त्या दिवशी माझे जाऊन येऊन 40-45 किमी. सायकलिंग होते. तो एक उत्तम व्यायाम तर आहेच पण सायकलिंग माझे मन स्वच्छ करते. माझी ऊर्जा चांगली ठेवते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होते. सायकल शहरातील रस्त्यांवरून चलवायची असो किंवा रमणीय रस्त्यांवरून फिरायचे असो, सायकल चलविताना मला स्वच्छंद वाटते. आणि एक असे संतुलन साधता येते, जे दुसऱ्या कोणत्याही कामातून येत नाही. सक्रिय राहण्याचा तो एक अत्यंत शाश्वत आणि प्रभावी उपाय आहे. आणि मी नेहमीच सायकल चालवण्यासाठी उत्सुक असतो.”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विनची भूमिका करत असलेला नवीन पंडिता म्हणतो, “माझ्यासाठी सायकल चालवणे हा केवळ व्यायामाचा एक प्रकार नाही, तर ती एक दुचाकी थेरपी आहे. शूटिंगच्या धकाधकीत आणि शहरातल्या गजबजाटात सायकल चालवल्याने माझे मन साफ आणि संतुलित होते. मला वाटते की, जागतिक सायकल दिन हा महत्त्वाचा गुरुमंत्र देऊन जातो की, सायकल चालवण्यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी मोठा आनंद देऊन जातात. शिवाय जिममध्ये न जाता फिट राहण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.”

‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत राशी पटेल ही व्यक्तिरेखा साकारणारी देशना दुगड म्हणते, “मला माझ्या मोठ्या भावाने सायकल चालवायला शिकवली आणि मला जमल्यानंतर मी माझ्या खास मैत्रिणीला शिकवली. आम्ही सकाळी सकाळी किंवा शिकवणीनंतर सायकल चालवत मैत्रिणींना भेटायला जायचो किंवा कधी तरी काही खायला जायचो. माझ्याकडे दोन सायकली आहेत- त्यातली एक गियरची आहे. मी हे अभिमानाने सांगू शकते की मी कोणत्याही पोशाखात- साडी, ड्रेस किंवा सूटमध्ये सायकल चालवू शकते. सायकल चालवताना मला खूप मोकळे वाटते, जणू बिना-पंखाने मी उडत असते! सायकल मला स्क्रीन, अभ्यास किंवा तणाव यापासून सुटका मिळवून देते. जागतिक सायकल दिनी, मला वाटते, मला वाटते प्रत्येक किशोरावस्थेतील मुलाने आणि मुलीने आपले फोन सोडून पेडल्सची निवड करावी- निदान थोड्या वेळासाठी तरी! सायकल चालवण्यात मजा आहे, ते आरोग्यासाठी चांगले आहे आणि स्वतःशी संवाद साधण्याची संधी देणारे साधन आहे.”

‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत अथर्व वागले ही व्यक्तिरेखा साकारणारा शीहान कपाही म्हणतो, “मला पहिल्यापासून सायकल चालवायला खूप आवडते. – सायकल चालवताना मला खूप स्वच्छंदी वाटते. माझी लहानपणीची एक गोड आठवण म्हणजे मी माझ्या बहिणीसोबत सायकल चालवतो आहे आणि माझे वडील आमच्या बाजूने जॉगिंग करत आहेत. मला आठवते आहे, त्या दिवशी अचानक पाऊस सुरू झाला होता. पण मागे फिरण्याऐवजी आम्ही सायकलिंग आणि जॉगिंग करत राहिलो! मी पडू नये म्हणून माझ्या वडिलांना त्यांचा एक हात पूर्ण वेळ माझ्या मानेच्या मागे ठेवला होता. आम्ही सगळे चिंब भिजलो होतो. खूपच मजा आली होती. जेव्हा आम्ही निथळत घरी आलो, तेव्हा माझ्या आईने आम्हा सगळ्यांसाठी गरमागरम भजी आणि आम्हा दोघांसाठी हॉट चॉकलेट केले होते! ती आख्खी संध्याकाळ एक ऊबदार आठवण म्हणून माझ्या मनात घर करून राहिली आहे. मला वाटते की जास्तत जास्त लोकांनी सायकल चालवली पाहिजे. ती तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तुमचे मन स्वच्छ करते आणि कधीकधी.. अशी आठवण तुम्हाला देऊन जाते, जी तुम्ही कधीच विसरू शकत नाही.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…