no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने फॉर्च्युनर आणि लिजेंडरच्या निओ ड्राइव्ह 48व्ही व्हेरियंट्स केल्या लॉन्च
बेंगळुरू,: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज फॉर्च्युनर आणि लिजेंडर या दोन लोकप्रिय एसयूव्हींमध्ये नवीन निओ ड्राइव्ह श्रेणी सादर केली आहे. अत्याधुनिक 48 वोल्ट सिस्टीमने सज्ज असलेले हे नवीन निओ ड्राइव्ह व्हेरियंट्स इंधन कार्यक्षमतेत सुधारणा, उत्कृष्ट ड्रायव्हिंग परफॉर्मन्स आणि अधिक आरामदायक अनुभव देतात व शहरी वाहतुकीपासून ते खडतर ऑफ-रोड परिस्थितींपर्यंत प्रवास अधिक सुलभ बनवतात.
2009 साली पदार्पण केल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरने प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवा बेंचमार्क निर्माण केला आहे. या वाहनाच्या बोल्ड डिझाइन, जबरदस्त परफॉर्मन्स आणि कुठल्याही प्रकारच्या रस्त्यावर सहज चालण्याच्या क्षमतेमुळे याला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. वर्षानुवर्षे, शहरी साहसी लोकांपासून ते ऑफ-रोड प्रेमी पर्यंत, या एसयूव्हीने विश्वासू ग्राहकांचा मजबूत समूह तयार केला आहे. याचाच भाग म्हणून, स्टाईल आणि फिचर्सने भरलेली फॉर्च्युनरप्रमाणेच जोडीस जोड असलेली लिजेंडर ही कार देखील टोयोटाची गुणवत्ता(क्वालिटी), टिकाऊपणा(ड्युरॅबिलिटी), विश्वासार्हता(रिलायबलिटी) आणि कस्टमर सेन्ट्रिक इंनोव्हेशनवर आधारितच आहे.
फॉर्च्युनर आणि लिजेंडर निओ ड्राइव्ह 48व्ही व्हेरियंट्सच्या लॉन्चबद्दल बोलताना, श्री. वरिंदर वाधवा, उपाध्यक्ष – विक्री, सेवा आणि युज्ड कार बिझनेस, म्हणाले, “भारतातील एसयूव्ही मार्केट सातत्याने वाढ होत असताना, ग्राहक आता अधिक प्रगत फीचर्स आणि खास स्टाइलिंगची मागणी करत आहेत. फॉर्च्युनर आणि लिजेंडर ही दोन्ही मॉडेल्स हेच देण्यास सक्षम आहेत. त्यांच्या बोल्ड डिझाइनमुळे, दमदार कामगिरीमुळे आणि सर्वसमावेशक फिचर्समुळे हे वेगवेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांच्या गरजा सहजपणे पूर्ण करतात.
आता या दोन्ही मॉडेल्समध्ये निओ ड्राइव्ह 48व्ही ग्रेडच्या रूपात आणखी एक मैलाचा दगड जोडण्यात आला आहे. सेगमेंटमधील पहिला प्रयोग म्हणून, हा आमचे पुढील पाऊल आमच्या ‘सर्वोत्तम गाड्या देण्याच्या कटिबद्धतेचे’ प्रतिक आहे जे बदलत्या ग्राहक जीवनशैलीशी सुसंगत आहे आणि कार्बन न्यूट्रॅलिटीच्या दिशेने टोयोटाचा मल्टी-पाथवे दृष्टिकोन अधोरेखित करतो. प्रॅक्टिकल आणि फ्युचर-रेडी मोबिलिटी सोल्युशन्सद्वारे आम्ही ग्राहक मूल्य वाढवण्याचा आणि अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
नवीन 48व्ही टेक्नॉलॉजी- इंधन कार्यक्षमतेत वाढ आणि कमी उत्सर्जन हे मुख्य उद्दिष्ट असलेल्या निओ ड्राइव्ह व्हेरियंट्समध्ये टोयोटाचा 2.8 लिटर, 4-सिलिंडर टर्बो-डिझेल इंजिन आता 48-वोल्ट सिस्टीमसोबत दिला गेला आहे. यामध्ये बेल्ट-इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर आणि लिथियम-आयन बॅटरीचा समावेश आहे. यातील हायब्रिड असिस्ट टेक्नॉलॉजीमुळे कमी स्पीडवर स्मूथ अॅक्सेलेरेशन, स्मूथ ऑपरेशन आणि अधिक कार्यक्षम परफॉर्मन्स मिळतो.
टोयोटा फॉर्च्युनर आणि लिजेंडर निओ ड्राइव्ह व्हेरियंट्समध्ये देण्यात आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे, हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीम्सप्रमाणेच ब्रेकिंग करताना निर्माण होणारी उर्जा वाया जाऊ न देता ती बॅटरीमध्ये पुन्हा चार्ज केली जाते. यामुळे ब्रेकिंग एनर्जीचे स्मार्ट रिजनरेशन होते आणि अतिरिक्त ब्रेकिंग कार्यक्षमता देखील मिळते. यासोबतच, नवीन स्मार्ट आयडल स्टार्ट-स्टॉप फंक्शन वाहन थांबलेले असताना इंजिन आपोआप बंद करून इंधन कार्यक्षमतेत वाढ आणि कार्बन उत्सर्जनात घट साधते.
या सर्व सुधारणांमुळे वाहनाची लोड क्षमता, टिकाऊपणा आणि अफाट ऑफ-रोड परफॉर्मन्स यावर कोणताही परिणाम होत नाही. उलट, विविध वापरांसाठी हे वाहन एक विश्वासार्ह, दमदार आणि स्मार्ट मोबिलिटी सोल्यूशन ठरते. यात दिलेला मल्टी-टेरेन सिलेक्ट सिस्टीम थ्रॉटल रिस्पॉन्स, ब्रेकिंग आणि ट्रॅक्शन कंट्रोल यामध्ये अचूक आणि इंटेलिजंटली समन्वय करून विविध प्रकारच्या रस्त्यांवर सर्वोत्तम परफॉर्मन्स मिळवतो.
फॉर्च्युनर आणि लिजेंडर या दोन्ही वाहनांची बाह्य रचना(एक्सटेरिअर) देखील त्यांच्या स्वभावाशी सुसंगत आहे. फॉर्च्युनरमध्ये बोल्ड आणि पर्पजफुल अपिलसह डिझाइन ठेवण्यात आले असून ते मुख्यत्वे ऑफ-रोड साहसी लोकांसाठी आकर्षक आहे. दुसरीकडे, लिजेंडर अधिक डायनॅमिक आणि प्रीमियम लूक देते, जिथे ड्युअल-टोन बॉडी कलर्स, स्प्लिट एलईडी हेडलॅम्प्स आणि स्लीक फ्रंट फॅसिया यामुळे ती शहरी नव्या पिढीतील वाहनप्रेमींसाठी आदर्श ठरते. दोन्ही वाहनांमध्ये ड्युअल-टोन लेदर अपहोल्स्ट्री, सॉफ्ट-टच मटेरियल्स आणि एर्गोनॉमिक सीटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासातही उत्कृष्ट आराम मिळतो.
सुरक्षिततेच्या बाबतीतही टोयोटाची परंपरा कायम राखत फॉर्च्युनर आणि लिजेंडरमध्ये अत्याधुनिक सुरक्षा फिचर्स देण्यात आले आहेत. यात सात एअरबॅग्स, एबीएस, व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (ब्रेक असिस्टसह), डब्ल्यूआयएल कॉन्सेप्ट सीट्स, हिल असिस्ट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (टीआरसी), चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम, प्री-टेन्शनर आणि फोर्स लिमिटर असलेले फ्रंट रो सीट बेल्ट्स, स्पीड ऑटो लॉक विथ इमर्जन्सी अनलॉक यांसारखे अनेक आवश्यक फिचर्स समाविष्ट आहेत.
ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी फॉर्च्युनर आणि लिजेंडर निओ ड्राइव्ह व्हेरियंट्ससह विशेष फायनान्स सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये 8 वर्षांपर्यंतच्या फायनान्स प्लॅन्स, कमी ईएमआय पर्याय, टोयोटा स्मार्ट बलून फायनान्स, प्री-अप्रूव्ड व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस (जसे की एक्स्टेंडेड वॉरंटी आणि टोयोटा जेन्युईन अॅक्सेसरीज) यांचा समावेश आहे. याशिवाय, 5 वर्षांची मोफत रोडसाइड असिस्टन्स, 3 वर्षे / 1,00,000 किमी ची स्टँडर्ड वॉरंटी (5 वर्षे / 2,20,000 किमी पर्यंत वाढवता येण्याजोगी) आणि कस्टमायजेबल टोयोटा स्माईल्स प्लस सर्व्हिस पॅकेज यांचा लाभही ग्राहकांना मिळतो.
फॉर्च्युनर आणि लिजेंडर निओ ड्राइव्ह व्हेरियंट्ससाठी बुकिंग 2 जून 2025 पासून सुरु झाली असून, डिलिव्हरी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार आहे. ग्राहक अधिकृत वेबसाइट www.toyotabharat.com वर ऑनलाईन बुकिंग करू शकतात किंवा जवळच्या टोयोटा डीलरशिपला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. यासंदर्भातील सर्व तपशीलांसाठी अधिकृत टोयोटा वेबसाइट किंवा भारतातील कोणत्याही अधिकृत टोयोटा शोरूमशी संपर्क साधावा.