Home क्राईम पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

2 second read
0
0
96

no images were found

पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
कोल्हापूर :आज करवीर पोलीस ठाणे कोल्हापूर येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन- सप्ताह चे औचित्य साधून हद्दीतील ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या, व त्याचे निरसन करण्यात आले.
दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी आपली फसवणूक होऊ नये, यासाठी कोणत्या प्रकारची दक्षता घ्यायला हवी . तसेच त्यावर उपाययोजना, याबाबत ही चर्चा करण्यात आली.
नुकताच करवीर पोलीस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिक असलेल्या भाजी विक्रेत्या सौ. वालुबाई भीमराव पाटील वय 65 रा.देवाळे तालुका करवीर यांची भाजी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून विश्वास संपादन करून सोन्याचे चिताक , पाटल्या ,साज, मनी मंगळसूत्र बोरमाळ, बुगडी,कर्णफुले वगैरे 13 तोळे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 6,68,750/- रू.चे फसवणूक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यातील आरोपीत महिला हीस अटक करून मुद्देमाल हस्तगत करून मा. न्यायालय यांचे आदेशाने त्यांचे दागिने परत करण्यात आले.
यावेळी फिर्यादी यांचे घरच्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकां समोर हा अनुभव कथन केला. पोलिसांनी दिलेल्या धीराबाबत ही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांचे आनंद अश्रू अनावर झाले.सर्व उपस्थितांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे, पोलीस दलाच्या उपक्रमांचे कौतुक करून पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…