Home धार्मिक ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

9 second read
0
0
4

no images were found

‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

इचलकरंजी (प्रतिनिधी ):- हिंदु धर्माविषयीचा अभिमान नसल्यामुळे आणि आपल्या संस्कृतीची महानता माहीत नसल्यामुळे हिंदु मुुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू युवतींनी राणी चेन्नमा, राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श आज समोर ठेवण्याची आवश्यकता आहे. ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींवर नाही, तर धर्मावर घातलेला घाला आहे. त्यामुळे सर्वांना धर्माच्या आधारेच आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थचे धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या जिव्हाजी सांस्कृतिक भवन, इचलकरंजी येथे ‘लव्ह जिहाद’वर आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होत्या. ‘येणार्‍या रक्षाबंधनाला हिंदू युवकांनी त्यांच्या बहिणींना ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ भेट द्यावा, असे आवाहन सद्गुरु स्वाती खाडये यांनी या प्रसंगी केले.
सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे आणि या सर्वांच्या साखळीतून आपल्याला हिंदु मुलींना वाचवायचे आहे. त्यामुळे प्रत्येक हिंदु कुटुंबात धर्माभिमान जोपासला गेला, तर देशातील एकही मुलगी या जाळ्यात अडकणार नाही.’’
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, श्री. दत्ता पाटील, विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा संघटक श्री. रामचंद्र जोशी, पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती सत्संगप्रमुख सौ. रेवती हणमसागर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. गजानन महाजनगुरुजी, शिवसेना जिल्हा संघटक श्री. मोहन मालवणकर, उद्योजक श्री. दिलीप पटेल, महिला आणि बालकल्याण सभापती सौ. रूपाली सातपुते, भाजपचे श्री. बाळकृष्ण तोतला, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंदा मकोटे, स्वकुळ साळी समाजाचे श्री. रामसागर पोटे, श्री. दत्तात्रय काजवे, सौ. कल्पना बागडे, उमीया सनातन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. भारतीबेन पटेल, गुजराती समाजाचे अध्यक्ष श्री. जयंतीभाई पटेल यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि महिला-युवती असे ६०० हून अधिकजण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. रमेश शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या व्याख्यानाचे सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे यांनी केले.

हिंदू युवतींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी न पडण्यासाठी दुर्गेचे रूप धारण करावे ! – ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे दोन भाग प्रसिद्ध होऊनही हिंदू समाज या संकटाविषयी अजूनही तितकासा जागृत झालेला दिसत नाही. वर्ष ७११ मध्ये महंमद बिन कासीमच्या आक्रमणापासून ते गझनी, घोरी, बाबर यांच्या काळापासून चालू झालेली ‘लव्ह जिहाद’ची भयावहता २०२६ पर्यंत चालू आहे. आजच इचलकरंजी येथेही ‘लव्ह जिहाद’ची घटना घडली आहे. मुलींना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पालक वेळ देत नसल्याने युवती-मुली मित्र शोधतात आणि ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. त्यामुळे पालकांनी दिवसांतून किमान १५ मिनिटे त्यांच्या पाल्यांशी संवाद साधण्यासाठी दिल्यास अनेक समस्या सुटू शकतील. ‘लव्ह जिहाद’ हे संकट जागतिक पातळीवरील संकट असून हिंदू युवतींनी ‘लव्ह जिहाद’ला बळी न पडण्यासाठी आता दुर्गेचे रूप धारण करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.
श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘सांगली, संभाजीनगर, सातारा यांसह अनेक शहरात काही ‘कॅफे’मध्ये २०० रुपये देऊन विशेष खोलींची व्यवस्था केली जाते. या खोल्यांमध्ये बाहेरचे काही दिसू नये म्हणून पडदे लावलेले असतात. या खोल्यांमध्येच हिंदू युवतींवर अत्याचार होतात आणि त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात. त्यामुळे पालकांनी जागरूक होऊन त्यांची मुलगी-युवती कुठे जातात याकडेही प्रकर्षाने लक्ष दिले पाहिजे. देश सुरक्षित ठेवायचा असेल तर आपल्या मुलींना सुरक्षित ठेवले पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकही युवती-मुलगी लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही, असा निर्धार आपण केला पाहिजे.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ अभियान !

या गंभीर संकटाचा प्रतिकार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण देशात ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे. हिंदु युवतींनी या अभियानाचे सक्रिय सदस्य होऊन स्वतःचे आणि राष्ट्राचे रक्षण करावे, असे आवाहन श्री. रमेश शिंदे यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक
Comments are closed.

Check Also

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग्य मूल्यं आणि अढळ चारित्र्य”:मनीष वाधवा

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग…