Home व्यवसाय पहिल्याच विक्रीत संपूर्ण स्टॉक संपल्यानंतर ए आय + स्मार्टफोन कडून नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो च्या पुढील विक्रीची घोषणा

पहिल्याच विक्रीत संपूर्ण स्टॉक संपल्यानंतर ए आय + स्मार्टफोन कडून नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो च्या पुढील विक्रीची घोषणा

0 second read
0
0
11

no images were found

पहिल्याच विक्रीत संपूर्ण स्टॉक संपल्यानंतर ए आय + स्मार्टफोन कडून नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो च्या पुढील विक्रीची घोषणा

कोल्हापूर, : ए आय + स्मार्टफोन ने आपल्या नव्याने सादर केलेल्या नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो या स्मार्टफोनच्या पुढील विक्रीची घोषणा केली आहे. २६ जून रोजी फ्लिपकार्ट वर झालेल्या पहिल्या विक्रीत दोन्ही स्मार्टफोनचा संपूर्ण स्टॉक विकला गेला. ग्राहकांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर दोन्ही स्मार्टफोनची पुढील विक्री ३० जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट वर सुरू होणार आहे.
या स्मार्टफोनचे अनावरण २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या “इंडियाज गॉट नोव्हा ” या ब्रँडच्या प्रमुख लॉन्च कार्यक्रमात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गॅझेट तज्ज्ञ राजीव मखनी यांनी केले. कार्यक्रमाला विनोदवीर व युट्युबर समय रैना तसेच ए आय + स्मार्टफोन चे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव शेठ उपस्थित होते. याशिवाय, ब्रँडच्या ओपन रिव्हिएव प्रोग्राम अंतर्गत अग्रगण्य तंत्रज्ञान तज्ज्ञ, समीक्षक, माध्यम प्रतिनिधी आणि ग्राहकांनीही सहभाग नोंदवला. या उपक्रमातून पारदर्शकता आणि ग्राहककेंद्री उत्पादन विकासाबाबतची कंपनीची बांधिलकी अधोरेखित झाली.
नोव्हा 2 निओ आणि नोव्हा 2 प्रो हे प्रथमच 5G स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपासून ते अधिक कार्यक्षम दैनंदिन स्मार्टफोन शोधणाऱ्या वापरकर्त्यांपर्यंत सर्वांसाठी विकसित करण्यात आले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In व्यवसाय
Comments are closed.

Check Also

लक्ष्मीपूरी बाजार पेठ परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई

लक्ष्मीपूरी बाजार पेठ परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाई कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विभागी…