Home सामाजिक “युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे” – आरोग्य सेवा आयुक्त (शहरी) तथा MSACS प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांचे आवाहन

“युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे” – आरोग्य सेवा आयुक्त (शहरी) तथा MSACS प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांचे आवाहन

13 second read
0
0
5

no images were found

“युवकांनी एड्स मुक्तीचे दूत बनावे” – आरोग्य सेवा आयुक्त (शहरी) तथा MSACS प्रकल्प संचालक डॉ. सुनील भोकरे यांचे आवाहन

कोल्हापुरात राज्यस्तरीय ‘रेड रन’, ‘रेड रिबन प्रश्नमंजुषा’ आणि ‘इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेन’चा उत्साहात शुभारंभ

कोल्हापूर,  : देशाच्या शाश्वत विकासासाठी एड्समुक्त समाज निर्माण करणे ही महत्त्वाची जबाबदारी असून, या अभियानात युवकांची भूमिका निर्णायक आहे. युवा पिढीने एचआयव्ही/एड्सविषयी सखोल व शास्त्रीय माहिती आत्मसात करून ती समाजापर्यंत पोहोचवावी आणि ‘एचआयव्हीमुक्तीचे दूत’ म्हणून कार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे प्रकल्प संचालक तथा राज्याच्या आरोग्य सेवेचे (शहरी )आयुक्त डॉ. सुनिल भोकरे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय रेड रन, रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि राज्यस्तरीय इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.

डॉ. सुनिल भोकरे म्हणाले, “रेड रन ही केवळ शारीरिक क्षमता सिद्ध करणारी स्पर्धा नसून ती एचआयव्ही/एड्समुक्त समाजासाठीची धाव आहे. मॅरेथॉन, प्रश्नमंजुषा, फ्लॅश मॉब, लोककला आणि विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

आजच्या काळात युवकांचा समाजमाध्यमांवरील प्रभाव मोठा आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर करून युवकांनी एचआयव्ही/एड्सविषयी अचूक माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

95:95:95 हे राष्ट्रीय एचआयव्ही नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण लक्ष्य साध्य करण्यासाठी तपासणी, उपचार आणि उपचारातील सातत्य याबाबत जनजागृती वाढविणे आवश्यक आहे. एचआयव्हीसह जगणारी व्यक्ती नियमित उपचार घेतल्यास सामान्य आणि निरोगी आयुष्य जगू शकते. त्यामुळे एचआयव्हीबाबत भीती किंवा गैरसमज न ठेवता वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि भेदभावमुक्त दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य उपसंचालक डॉ. माने यांनी एड्स मुक्तीसाठी युवकांनी वज्रमूठ बांधावी असे सांगितले.

डॉ. मुदाम यांनी प्रस्ताविकात राज्यातील एड्स मुक्तीसाठी चाललेल्या कामाची माहिती सांगितली.

या वेळी आरोग्य डॉ. दिलीप माने- उपसंचालक कोल्हापूर मंडळ, डॉ. सरिता थोरात – कोल्हापूर, जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. नागनाथ मुदाम- सहसंचालक(रक्त संकमन सेवा), डॉ. कपिलदेव पाटील- सहसंचालक ( काळजी आधार उपचार), डॉ. राहुल जाधव- सहसंचालक(मूलभूत सेवा), डॉ. लोकेश गभणे – सहसंचालक(गुपतरोग), जगदीश पाटील- सहसंचालक(प्रतिबंध), ), डॉ. योगेश साळे- प्राचार्य(प्रशिक्षण केंद्र), सातारा, अमरावती, हिंगोली जिल्हाशल्यचिकित्सक,,विद्यार्थी, युवक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

रेड रनमध्ये कोल्हापूरचा दबदबा

राज्यस्तरीय रेड रन स्पर्धेत युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.

रेड रन – मुले

प्रथम : प्रवीण कांबळे – कोल्हापूर

द्वितीय : अभिषेक देवकाते – कोल्हापूर

तृतीय : कार्तिककुमार करिहरपाल – नाशिक

उत्तेजनार्थ : कृष्णा गायक – अहिल्यानगर

रेड रन – मुली

प्रथम : सुकन्या शिवणे – कोल्हापूर

द्वितीय : स्नेहल खरात – कोल्हापूर

तृतीय : प्रणाली शेगोकार – बुलढाणा

उत्तेजनार्थ : ऋतिका नांदेवार – वाशीम

रेड रिबन प्रश्नमंजुषेत साताऱ्याच्या संचिता हात्ते प्रथम

एचआयव्ही/एड्स, प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य, तपासणी, उपचार आणि सामाजिक जागरूकता या विषयांवर आधारित राज्यस्तरीय रेड रिबन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विजेते-

प्रथम : कु. संचिता हात्ते – सातारा

द्वितीय : कु. अस्मि जोशी – बुलढाणा

तृतीय : कु. कुलदीप लांडे – यवतमाळ

उत्तेजनार्थ : कु. अर्जुन जायभये – अकोला

नॅको, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनच्या माध्यमातून राज्यभर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

या अंतर्गत गावपातळीवर, शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच विविध समुदायांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या कार्यशाळा आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. भोकरे यांनी दिली.

या अभियानाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून गैरसमज दूर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती पोहोचविणे, तपासणी व उपचारासाठी प्रोत्साहन देणे आणि एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींवरील कलंक व भेदभाव कमी करणे हा आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा जिल्ह्यांचा गौरव

सन २०२५-२६ मध्ये इंटेन्सिफाइड IEC कॅम्पेनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हिंगोली, अमरावती, सातारा, जळगाव, पालघर आणि नागपूर या सहा जिल्ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

      या जिल्ह्यांनी एचआयव्ही/एड्स जनजागृती, समुदाय सहभाग आणि विविध IEC उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची यावेळी दखल घेण्यात आली.यावेळी अमरावतीचे गंधर्व बहुउदेशीय संस्था यांनी लोककला तसेच NIT च्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फ्लॅश मॉबचे सादरीकरण केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

हस्तिनापुर के वीर मालिकेतील कलाकारांनी या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांच्या फिटनेस आणि खेळांमधून मिळालेल्या प्रेरणांचा अनुभव केला शेअर.

हस्तिनापुर के वीर मालिकेतील कलाकारांनी या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांच्या फिटनेस आण…