Home सामाजिक शिंगणापूर येथील पंचगंगा नदीवरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात होत असल्याने ते तयार करून त्वरित बसवा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन

शिंगणापूर येथील पंचगंगा नदीवरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात होत असल्याने ते तयार करून त्वरित बसवा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन

9 second read
0
0
8

no images were found

शिंगणापूर येथील पंचगंगा नदीवरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात होत असल्याने ते तयार करून त्वरित बसवा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन

कोल्हापूर- कोल्हापूर शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी शिंगणापूर येथील पंचगंगा नदीवरील पुलावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि अवजड तसेच हलक्या वाहनांची मोठी वर्दळ असते. सद्यस्थितीत या बंधार्‍याच्या दोन्ही बाजूंना संरक्षण कठडे (रेलिंग) नसल्याने हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. रात्रीच्या वेळी अपुर्या प्रकाशामुळे, तसेच पावसाळ्यात किंवा धुक्याच्या वातावरणात वाहनचालकांचा अंदाज चुकून वाहने थेट नदीपात्रात कोसळण्याचे गंभीर अपघात घडत आहेत. यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असून, अनेकदा जीवितहानी व वित्तहानी होत आहे. तरी शिंगणापूर येथील पंचगंगा नदीवरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात होत असल्याने ते तयार करून त्वरित बसवण्यात यावेत, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.

     या प्रसंगी महेंद्र अहिरे, शिवानंद स्वामी, अजित सुस्वरे, मधुकर नाझरे, सोमनाथ शिवनगेकर उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता, या बंधार्‍यावर तातडीने मजबूत लोखंडी किंवा सिमेंटचे सुरक्षा कठडे बसवणे अत्यंत गरजेचे आहे. तरी प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन लवकरात लवकर शिंगणापूर बंधार्‍याला कठडे बसवण्याचे काम हाती घ्यावे आणि संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कोल्हापूर शहरातील नाना पाटील चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेला खांब हटवून रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करा ! – सुराज्य अभियानाचे निवेदन

कोल्हापूर – नाना पाटील चौकातील मुख्य रस्त्याच्या मधोमध एक खांब उभा आहे. हा चौक शहरातील एक अत्यंत वर्दळीचा भाग असून येथून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शालेय बस, दुचाकीस्वार आणि पादचारी प्रवास करत असतात. मात्र, रस्त्याच्या अगदी मधोमध हा खांब असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात किंवा गर्दीच्या वेळेत समोरून येणार्‍या वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे हा खांब वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असून भविष्यात मोठा जीवघेणा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी कोल्हापूर शहरातील नाना पाटील चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेला खांब हटवून रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करा, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि वीज वितरण आस्थापनेच्या नावे असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले. या प्रसंगी महेंद्र अहिरे, शिवानंद स्वामी, अजित सुस्वरे, मधुकर नाझरे, सोमनाथ शिवनगेकर उपस्थित होते.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आणि सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने हा खांब तातडीने काढणे अत्यंत गरजेचे आहे. तरी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाच्या (महावितरण / विद्युत विभाग) समन्वयाने या खांबाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि तो खांब रस्त्याच्या मधून काढून सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’; ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…