Home Uncategorized राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात : शहीद  झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात : शहीद  झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

6 second read
0
0
6

no images were found

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात : शहीद  झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई,  : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील शहीद जवानांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी शहीद जवानांना अभिवादन केले.

     मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात आयोजित या अभिवादन कार्यक्रमास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.

     यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद स्मारकास पुष्प अर्पण करून शूर जवानांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त केल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आवश्यक निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी आवश्यक निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवें…