no images were found
स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण
कोल्हापूर, : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन शनिवार, 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्यालयात पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर यांच्या हस्ते शनिवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
ध्वजारोहण समारंभासाठी गणवेशधारी अधिकारी नियमानुसार पोशाख करतील, तर नागरिक व शासकीय अधिकारी हे राष्ट्रीय पोशाख परिधान करतील. ध्वजारोहण समारंभ सुरु होण्यापूर्वी 20 मिनिटे अगोदर उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.