Home मनोरंजन प्रेमाची गोष्ट मालिकेत लगीनघाई

प्रेमाची गोष्ट मालिकेत लगीनघाई

3 second read
0
0
102

no images were found

प्रेमाची गोष्ट मालिकेत लगीनघाई

 

 

स्टार प्रवाहच्या प्रेमाची गोष्ट मालिकेत सुरु आहे मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. हो – नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या याच प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे.

आता कोळी म्हण्टलं आणि हळदीला धुमशान झालं नाही तर नवल. सागरच्या हळदीसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जय्यत तयारी केलीय. एरव्ही मॉडर्न अंदाजात दिसणारा सागर हळदीसाठी पारंपरिक कोळी वेशात दिसणार आहे. खास बात म्हणजे हळदी कार्यक्रमासाठी गायक दादूस हजेरी लावणार आहे. हळदी कार्यक्रमात दादूस कोळी गाणी गाऊन धमाल करणार आहे. दादूसच्या धमाकेदार कोळी गाण्यांवर संपूर्ण परिवार ठेका धरणार आहे. तिकडे मुक्ताच्या हळदीसाठीही संपूर्ण गोखले कुटुंब एकत्र येणार आहे. मुक्ताला आशीर्वाद देण्यासाठी लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील कलाची आई म्हणजेच संगीता देखिल खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे मुक्ता-सागरच्या हळदीची रंगत द्विगुणीत होणार हे मात्र नक्की. तेव्हा पाहायला विसरु नका प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथर्व तावरे, प्रणव मोरे व ओजस व्हनमाने आघाडीवर.     

जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत दिशा पाटील, हित बलदवा, अथ…