
no images were found
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या विरोधात तीव्र निदर्शने
कोल्हापूर : काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटीहून अधिक बेनामी संपत्ती सापडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा कोल्हापूर महिला मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक या ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस सरकारचा अधिकार असो, धीरज साहूचे करायचे काय खाली डोके वर पाय, राहुल गांधी जवाब दो महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत काळे झेंडे दाखवत धीरज साहूच्या विरोधात तीव्र घोषणा दिल्या. ना नीती विकासाची ना भीती कायद्याची कॉंग्रेसला आहे फक्त हाव नोटांची, देशाचा एकेक रुपया परत द्यावाच लागेल धीरज साहूला जेलची हवा खावीच लागेल, ७० वर्षे देश लुटला कॉंग्रेसने फक्त पैसा खाल्ला, गरीब जनतेचे घास हिरावले काँग्रेसींनी स्वत:चे इमले बांधले अशा आशयाचे फलक यावेळी दर्शवण्यात आले.
याप्रसंगी बोलताना महिला अध्यक्षा रूपाराणी निकम म्हणाल्या, एका खासदाराच्या घरात ३०० कोटीहून अधिक बेनामी संपत्ती निघते हि निंदनीय गोष्ट आहे. कॉंग्रेसी खासदार, आमदार हे जनतेचा पैसा जनतेच्या हितासाठी न वापरता काँग्रेसीवृत्तीने आपली स्वत:ची घरे भरण्याचे काम करत आहेत. हि फक्त एक घटना निदर्शनास आली आहे परंतु अशा कितीतरी घटना असतील कि ज्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणता भ्रष्टाचार करून मिळवलेला पैसा बाहेर पडेल. सर्वसामान्य कुटुंबप्रमुखांकडून घर चालवण देखील तारेवरची कसरत असते आणि इकडे मात्र भ्रष्टाचारी व्यक्ती आपले घर पैश्याने भरत आहेत. एकीकडे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी म्हणजे गॅरंटी आणि ग्यारंटी म्हणजे मोदीजी हे आता ब्रीद वाक्य बनले असताना काँग्रेसी खाबुगिरीची वृत्ती कमी होताना दिसत नाही. भाजपा अशा वृत्तीच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. एका खासदाराकडे इतकी संपत्ती मिळून येणे यातून देशासाठी त्यांना किती आत्मीयता आणि तळमळ आहे यातून दिसून येते. यासर्व गोष्टीचा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उपस्थित महिलांनी खासदार धीरज साहूच्या पुतळ्याला जोडे मारून आपल्या तीव्र भावना दर्शवल्या.
याप्रसंगी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम, धनश्री तोडकर, प्रणोती पाटील, शितल तिरुके, शारदा पोटे-क्षीरसागर, संपदा काळे, अश्विनी गोपूगडे, दिपाली नार्वेकर, अश्विनी वास्कर, सविता भिवसे, पुष्पा लोहार, नंदा सुतार, जयश्री वायचळ यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.