no images were found
दोन दिवसात राज्यात जोरदार पावसाची शक्यता !
सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आज मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. 31 मे रोजी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात, शनिवार दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनर्यंत वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते.पुढील 2 दिवसात मात्र उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल.
मुंबईसह कोकणातील उष्णता कायम राहणार आज व उद्या गुरुवार- शुक्रवारी खान्देश व मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात उष्णता सदृश्य लाट टिकून राहणार आहे. तर खान्देशात रात्रीचाही उकाडा जाणवेल अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील 3 दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मान्सून केरळ राज्याबरोबरच देशाच्या पूर्वोत्तर भागातील 7 राज्यातही त्याने प्रवेश केला आहे.मान्सून केरळ राज्याच्या टोकावरील सक्रियतेंनंतर उर्वरित केरळाचा बराचसा भाग, कन्याकुमारी, दक्षिण तामिळनाडू, मालदीव व लक्षद्विप भागापर्यंत त्याने आज मजल मारली आहे.